ताज्या घडामोडी

भाजपा केंद्र सरकार,सामान्य माणसाच्या प्रत्येक घासावर कर लावत असेल,तर सामान्य माणसाने जगायचे कसे? जयंतराव पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.२५ प्रतिनिधी
भाजपा केंद्र सरकार,सामान्य माणसाच्या प्रत्येक घासावर कर लावत असेल,तर सामान्य माणसाने जगायचे कसे? आता स्वस्थ बसून चालणार नाही. केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ अवळावी लागेल,अशी भावना माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. आंबेडकरनगर येथे शहरी आरोग्य केंद्र उभारून शहरातील नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा देत आहोत. शहरात वेग-वेगळ्या भागात आणखी तीन आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्लामपूर येथील बेघर वसाहत,मॉडर्न हायस्कुल,सिध्देश्वर मंदीर,पोतदार हॉल व माळी गल्ली येथील संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते. युवा नेते प्रतिकदादा पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,अँड.चिमणभाऊ डांगे, खंडेराव जाधव,सुभाषराव सुर्यवंशी,दादासो पाटील,अँड.धैर्यशील पाटील,संदीप पाटील, रोझा किणीकर,शंकरराव चव्हाण,अरुण कांबळे,मुकुंद कांबळे,सचिन कोळी,स्वरूप मोरे
आ.पाटील म्हणाले, देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. पूर्वी ४०० रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर १०६५ रुपयांवर गेला. महागाईने कळस गाठला आहे. रुपयाचे अवमूल्यन होवून पूर्वी ७०-७२ रुपयाला मिळणारा डॉलर आता ८० रुपयांवर गेला आहे. केंद्र सरकारने कपड्यावर कर आकारला. अलीकडे त्यांनी अन्न धान्यावर ५ टक्के जी एस टी आकारला आहे. सामान्य माणसाला जगणे मिश्किल झाले आहे. आपण तहसिलदार कार्यालय इमारतीस १४ कोटीचा निधी देवून इमारत पूर्ण केली. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पात इस्लामपूरचा समावेश केला. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवून गैर प्रकारास आळा घातला. सांगली रस्त्यावर २ ठिकाणी सिग्नल बसविले. शहराच्या विकासासाठी जे-जे करणे शक्य आहे,ते-ते आपण करीत आहोत.
यावेळी माजी नगराध्यक्ष अँड.चिमण भाऊ डांगे,पै.भगवान पाटील,शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,खंडेराव जाधव,माजी नगरसेवक डॉ.संग्राम पाटील,माजी नगर सेविका सौ.जयश्री माळी,केदार पाटील, कु.प्रणव जाधव,कु.हर्षवर्धन मोहिते यांचीही भाषणे झाली.
प्रा.शामराव पाटील,बाळासाहेब पाटील (धनी),शंकरराव पाटील,अँड.संपतराव पाटील,आनंदराव पाटील,बाळासाहेब पाटील, युवराज पाटील,सविता आवटे,बशीर मुल्ला, विलास ताटे,विनायक सदावर्ते,दिलीप जावळे,कमल पाटील,प्रतिभा पाटील,सुरेखा जगताप, जयश्री पाटील,शुभांगी शेळके, राजवर्धन लाड, सागर जाधव,प्रा.शरद कुंभार, शैलजा जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने या बैठकांना उपस्थित होते.

फोटो ओळी- इस्लामपूर येथील प्रभाग ३ मधील बैठकीत बोलताना आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर प्रतिकदादा पाटील, खंडेराव जाधव,अँड.धैर्यशील पाटील,सदानंद पाटील,जयश्री पाटील,शुभांगी शेळके,आयुब हवलदार.इस्लामपूर येथील प्रभाग ११ मधील बैठकीत बोलताना आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर प्रतिकदादा पाटील, पै.भगवान पाटील,चिमणभाऊ डांगे,खंडेराव जाधव,अँड.धैर्यशील पाटील,जयश्री माळी, रोझा किणीकर.इस्लामपूर येथील प्रभाग ६ मधील बैठकीत बोलताना आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर दादासो पाटील, अँड.धैर्यशील पाटील,रोझा किणीकर,सचिन कोळी,सविता आवटे,बशीर मुल्ला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!