ताज्या घडामोडी

प्रज्ञा पाटील, इस्लामपूर यांची विक्रीकर निरिक्षकपदी निवड

Spread the love

इस्लामपर :-

ऊरूण – इस्लामपूर येथील प्रज्ञा भगवान पाटील यांची एम. पी. एस. सी. मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये विक्रीकर निरिक्षक ( Sale Tax Inspector) पदी इ. डब्ल्यू. एस. प्रवर्गात महाराष्ट्रात मुलीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून निवड झाली आहे. प्रज्ञा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श बालक मंदीर इस्लामपूर येथे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्यामंदीर हायस्कुल इस्लामपूर तर बी.टेक. (अँग्री) पदवीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथे पूर्ण झाले आहे. इस्लामपूर येथील राजर्षी शाहू महाराज अकॅडमी मध्ये त्या स्पर्धा परिक्षेची तयारी करित होत्या. त्यांच्या या विक्रीकर निरिक्षक पदी निवडीबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी गुलालाची उधळन करून पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. या निवडीमध्ये कुटुंबीयांचा मोठा सहकार्याचा वाटा आहे. तसेच विक्रम पाटील सर व केंगारसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नुतन विक्रीकर निरीक्षक प्रज्ञा पाटील या ग्रामसेवक सौ. धनश्री पाटील यांच्या बहिण आहेत. तसेच प्रज्ञा पाटील यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवी ठिकाणी शिक्षण घेतल्या सर्व शिक्षक, कर्मचारी, नातेवाईक तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी शाल, फेटा व बुके देवून अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!