ताज्या घडामोडी

जिजाऊ नगरीत प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेच्यावतीने विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ नगरीत नुकतेच महाराष्ट्रातील ख्यातनाम शिव व्याख्याते नितीन बानुगडे – पाटील यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होते. हजारो विद्यार्थी, कार्यकर्ते व मान्यवर या व्याख्यानासाठी खास उपस्थित होते.

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी शहाजी महाराज, जिजाऊ मांसाहेब यांच्या प्रेरक शिकवणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची जडण-घडण मांडली. स्वराज्यातील सुराज्यावर महाराजांचा कसा भर होता, ते त्यांनी अनेक उदाहरणांनी स्पष्ट केलं. तसंच तोच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे चालवल्याचंही ते म्हणाले. आजच्या परिस्थितीतही त्याच सुराज्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी मांडले. सुराज्यासाठी निलेश सांबरे यांच्यासारखे समाजसेवक व्यवसाय सांभाळत जनसेवा करीत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. कोल्हापूरचा तरुण स्वप्निल माने प्रतिकुलतेशी झुंजत पालघरात येतो, जिजाऊच्या सहकार्यानं प्रशासकीय परीक्षेत यशाची झेप घेतो, याचा दाखल देत तरुणांना सुराज्य घडवण्यासाठी असा आधार देणं आवश्यक असल्याचंही प्रतिपादन प्रा. बानुगडे पाटील यांनी ओघवत्या वाणीत केले.

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानातून जीवन कसं जगायचं तो संदेश मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग, त्यामागील रणनीती समजवत प्रा. नितीम बानुगडे – पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकलीत.

आपल्या अनोख्या वक्तृत्वशैलीतून नितीन बानुगडे पाटील यांनी उपस्थितांना प्रेरणादायी व्याख्यान दिले. प्रा.नितीन संपतराव बानुगडे – पाटील हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांनी २१व्या वर्षी लिहिलेल्या महानाट्याचा सर्वत्र गौरव झाला. एवढंच नव्हे तर जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून त्यांचा जागतिक गौरव झाला आहे. स्वतःच्या ओजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यशवंतराव चव्हाण अशा अनेकांचे जिवीतकार्य तरुणपीढीपर्यंत प्रभाविपणे पोहोचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून कायमच केलेलं आहे. अनेक विषयांवर प्रबोधन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय. त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची वर्तमानातील व्याख्यानं प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली आहेत. प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून ‘मा.प्रा.नितीन बानुगडे पाटील’ यांची ओळख आहे.

या व्याख्यानमालेच्या प्रारंभी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे आद्य संस्थापक निलेश सांबरे यांनी प्रास्ताविक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!