अध्यात्मिकमावळ

या गुरु भगवंतांचा चातुर्मास म्हणजे तळेगाव वासियांना अनोखी पर्वणी – डॉ मंजुळा लोढा.

Spread the love

या गुरु भगवंतांचा चातुर्मास म्हणजे तळेगाव वासियांना अनोखी पर्वणी – डॉ मंजुळा लोढा.Chaturmas of Guru Bhagwant is a unique celebration for Talegaon residents – Dr Manjula Lodha.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ सप्टेंबर.

श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब, रजतचंद्र विजयजी महाराज साहेब व प्रीतीयश विजयजी महाराज साहेब या गुरु भगवंतांचा चातुर्मास तळेगाव दाभाडे शहरात होणे म्हणजे तळेगाव शहरवासीयांना एक अनोखी पर्वणीच मिळालेली आहे असे उद्गार कवियत्री,साहित्यिक,डॉ मंजुळा मंगल प्रभात लोढा यांनी आज तळेगाव शहरात गुरु भगवंतांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असताना व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये चातुर्मास निमित्त विराजित गुरु भगवंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री मंगल प्रभात जी लोढा यांच्या सुविद्य पत्नी साहित्यिक, कवियात्री डॉक्टर मंजुळा मंगलप्रभात लोढा या तळेगाव शहरात आल्या होत्या.

डॉ मंजुळा मंगलप्रभात लोढा यांचे सामाजिक कार्य फार मोठे असून गोरगरिबांना मदत करण्यासाठी व गोशाळेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या मंजुळाबेन यांनी आजपर्यंत ९ मंदिरे बांधून पूर्ण केली असून ४ मंदिराची प्राणप्रतिष्ठा आता होण्याचे बाकी आहे असे श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब यांनी सांगितले.

श्री रजतचंद्र विजयजी महाराज साहेब यांना गुरु भाऊ म्हणून मानलेल्या डॉ मंजुळाबेन या साहित्यीक व कवियत्री असून अतिशय साधी राहणे त्यांची आहे असे श्री रजतचंद्र विजयजी महाराज साहेब यांनी सांगितले.

यावेळी त्यांचा श्री.जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिर संघाच्या वतीने बहुमान करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी श्री जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त,श्रावक व श्रावीका उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!