आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न…

स्पर्धेचे १७ वे वर्ष..

Spread the love

कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यवाचन स्पर्धा उत्सहात संपन्न…….स्पर्धेचे १७ वे वर्ष.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३१ जानेवारी.

कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात संपन्न झाली.हे स्पर्धेचे १७ वे वर्ष होते शालेय, खुल्या आणि शिक्षक गटात झालेल्या या स्पर्धांमध्ये तळेगाव दाभाडे, पिंपरी चिंचवड, पुणे, मावळ, चाकण या ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभाला भारतीय नौसेनेतील निवृत्त अधिकारी दीपक जायगुडे, नाट्य परिषदेचे विश्वस्त पं. सुरेश साखवळकर, खजिनदार नितीन शहा, कलापिनीचे श्रीशैल गद्रे, डॉ. अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक फेरीचे परीक्षण पूजा डोळस, राजेंद्र पाटणकर आणि मनोज डाळिंबकर यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षण दिलीप जोगळेकर, मानसी आपटे आणि डॉ अश्विनी परांजपे यांनी केले.

दीपक जायगुडे म्हणाले, “ भारतीय नौसेनेमधील कामात आणि कला क्षेत्रात असलेलं साम्य प्रकर्षानी जाणवलं. शिस्त, ध्यास आणि उत्साह या तीन महत्त्वाच्या गुणांवर कलापिनी संस्था काम करते आहे. लहान वयात मुलांना कलेद्वारे संस्कार देण्याचे महत्त्वाचे काम संस्थेद्वारे केले जात आहे”
साखवळकर म्हणाले, “ कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या दोन्ही संस्थांच्या वतीने राबवण्यात येत असलेला उपक्रम निश्चितपणे प्रशंसनीय आहे. वाचिक अभिनय समृद्ध होण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”

मानसी आपटे म्हणाल्या, “ कलापिनी मध्ये नाट्यवाचन स्पर्धा अतिशय निकोप तरी चुरशीची झाली. सगळ्या संघांची तयारी उत्तम होती. उत्तमोत्तम संहितांची निवड केली होती हे या स्पर्धेचे परीक्षण करताना लक्षात आले.”
डॉ अश्विनी परांजपे आपल्या मनोगतात म्हणाल्या, “ वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धकांची तयारी वाखाणण्याजोगी होती. डोळे मिटताच नाटक समोर घडते आहे की काय असे काही संघांच्या बाबत जाणवले.”

“तळेगाव आणि माझा स्नेहबंध जुना आहे. एका व्यवसायिक नाटकाच्या निमित्ताने तळेगावला आलो होतो. आज पुन्हा नाटक हाच समान धागा आहे. स्पर्धा अतिशय चुरशीची होती. स्पर्धेचे संयोजन देखील नेटके होते असे मनोगत दिलीप जोगळेकर व्यक्त केले,”.
स्वागत नितीन शहा यांनी केले. प्रास्ताविक डॉ परांजपे यांनी केले. स्पर्धा संयोजक अशोक बकरे यांनी आभार मानले. डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी सुत्रसंचलनकेले.
शार्दूल गद्रे आणि प्रतिक मेहता यांनी ध्वनिसंयोजन केले. विश्वास देशपांडे,रश्मी पांढरे, श्रीपाद बुरसे, दीप्ती आठवले, सुप्रिया खानोलकर, दीपाली जोशी, विद्या अडसुळे, विनया अत्रे आदींनी संयोजन केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
शालेय गट
सांघिक
प्रथम – बाहुलीचे लग्न – डी आय सीज इंग्लिश मिडीयम स्कूल,निगडी.
द्वितीय – वाघोबा रस्त्यावर? अन् – सहयाद्री इंग्लिश स्कूल
तृतीय – पक्षिणी बघ गेली कोटरी – आदर्श विद्या मंदिर
उत्तेजनार्थ – इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया – जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ – चांभार चौकशीचे नाटक, – इंद्रायणी इंशिल मिडीयम स्कूल
उत्तेजनार्थ – एप्रिल फूल – कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल

दिग्दर्शन
प्रथम – चित्रा देशपांडे – डी आय सीज मिडीयम स्कूल, निगडी.
द्वितीय – सुजाता डावखरे आणि प्रतीक्षा ढवळे – पक्षिणी बघ गेली कोटरी
लेखन
विदुला कुडेकर – वाघोबा रस्त्यावर?अन – सहयाद्री इंग्लिश स्कूल
चित्रा देशपांडे – बाहुलीचे लग्न – डी आय सीज इंग्लिश मिडीयम स्कूल
चित्रा देशपांडे- परीक्षा – डी आय सीज इंग्लिश मिडीयम स्कूल ,निगडी
वाचिक अभिनय – मुले
प्रथम – वेदांत जगताप –डी आय सीज इं. मिडीयम स्कुल, निगडी.
द्वितीय – स्वागत सागर कुंभार – आदर्श विद्या मंदिर
तृतीय – रुद्र उमेश वैरागी – आदर्श विद्या मंदिर .
वाचिक अभिनय – मुली
प्रथम – स्वरांगी संदीप गाडेकर कोटरी – आदर्श विद्या मंदिर.
द्वितीय – आद्या कदम सुमन – डी आय सीज इंग्लिश मिडीयम स्कूल
तृतीय – वैष्णवी थरकुडे – इंद्रायणी इं. मिडीयम स्कूल
प्रोत्साहन पारितोषिके – मुले
• साईराज संतोष सावळे – सह्याद्री इं. स्कूल, यतार्थ शहा – पार्श्व प्रज्ञालय ज्ञानसंस्कार मंदिर
• ओम रवींद्र कवले – स्वा. विवेकानंद इं. स्कूल, • नैतिक माळी – डी आय सीज इं. माध्य. स्कूल
मुली
• लावण्या गंभीरे – सिटी प्राईड इं. स्कूल, निगडी, • आकांक्षा दिवे – सरस्वती प्राथ. विद्या मंदिर
• जिनत शाह – भारतीय जैन संघटना, पिंपरी, • वेदिका चाफेकर – सरस्वती माध्य. विद्या मंदिर
खुला गट
सांघिक
प्रथम – माझी पहिली चोरी – कलाकार मंडळी
द्वितीय – सोबत – सहज ग्रुप
तृतीय – हेल्पलेस – एस. आर. ए . प्रोडक्शन
उत्तेजनार्थ – मजार – अभिरंग चिंचवड
उत्तेजनार्थ – वाजे पाऊल आपले – स्वस्थ्यायोग तळेगांव
दिग्दर्शन
प्रथम – अक्षय व्यवहारे – माझी पहिली चोरी – कलाकार मंडळी
द्वितीय – पंकज चव्हाण – मजार – अभिरंग चिंचवड
लेखन
शिवम पाटील – सोबत – सहज ग्रुप
समीर महाजन – एका लग्नाची गोष्ट – तालतरंग म्युझिक अकॅडमी
अभिनय -पुरुष
प्रथम – पंकज चव्हाण – मजार – अभिरंग चिंचवड
द्वितीय – अक्षय व्यवहारे – माझी पहिली चोरी – कलाकार मंडळी
तृतीय – प्रथमेश सावंत – सोबत – सहज ग्रुप
अभिनय – महिला
प्रथम – अथर्वा रानडे – हेल्पलेस – एस. आर. ए . प्रोडक्शन
द्वितीय – नेहा नाईक – माझी पहिली चोरी – कलाकार मंडळी
तृतीय – ईश्वरी हतोलकर – मजार – अभिरंग चिंचवड
अभिनय प्रमाणपत्र( प्राथमिक) – पुरुष
मनीष परिहार – इसाक – शेख मोहम्मद, शशीधर बडवे -दिगंबर – वरचा मजला रिकामा.रुद्रांग नाट्य शाखा, निगडी.
अभिनय प्रमाणपत्र( प्राथमिक) – महिला
सीमा पोंक्षे – मंजुश्री – थोडे उलट थोडे सुलट, मंजुश्री कलाविष्कार.
प्रियांका आचार्य – अँना – रातराणी, शब्दयोगी कला साहित्य कट्टा, निगडी.
अक्षया कुलकर्णी – रमा – कौटितला कवटी, कलाकंद प्रो., कोमल शिरभाते – सईदा – शेख मोहम्मद, कला साम्राज्य, चिंचवड.
शिक्षक गट सांघिक
प्रथम – वसा वारीचा -श्री साईनाथ बालक मंदिर ,चिंचवड
द्वितीय – सेकंड इनिंग – कुमारभवन , तळेगांव
तृतीय – हे गेले – जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ – नळावरच भांडण – बालभवन , तळेगांव
उत्तेजनार्थ – मतिमंद माणुसकी – कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल
उत्तेजनार्थ – बरे सत्य बोला, सह्याद्री तळेगांव
दिग्दर्शन
प्रथम – वैभवी तेंडुलकर – श्री साईनाथ बालक मंदिर , चिंचवड
द्वितीय – धनश्री कांबळे – जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे
लेखन –
वैभवी तेंडुलकर – वसा वारीचा – श्री साईनाथ बालक मंदिर
मीरा कोण्णूर – नळावरचे भांडण – बालभवन , तळेगांव
वंदना सपताळे – भाषेची गंमत
वाचिक अभिनय – पुरुष
संदीप मनवरे – सेकंड इनिंग, कुमार भवन , तळेगांव दाभाडे.
महिला
प्रथम – चांदणी पांडे – आजी – हे गेले – जैन इंग्लिश स्कूल
द्वितीय – अनघा बुरसे – उक्कु आजी – सेकंड इनिंग – कुमारभवन , तळेगांव
तृतीय – स्वाती जगदिश कुलकर्णी – आई ,युवती – वसा वारीचा – श्री. साईनाथ बालक मंदिर
अभिनय प्रमाणपत्र
आपुलकी आगळे – आजी | बोक्या सातबंडे. ज्योती चिंदगे- शिल्पा | खून झालाय
वैभवी भोसले- उषा/जयंत | विद्रुप. शैला बर्वे- स्नेहाची आजी | घुसमट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!