अध्यात्मिकमावळसामाजिक

श्री गणेश तरुण मंडळात, देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धा संपन्न..

श्री गणेश तरुण मंडळ, आयोजित व स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर प्रथम.

Spread the love

श्री गणेश तरुण मंडळात, देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धा संपन्न, श्री गणेश तरुण मंडळ आयोजित व स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर प्रथम.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ सप्टेंबर.

तळेगाव नगरीतील मानाचा पाचवा गणपती असलेल्या श्री गणेश तरुण मंडळ आयोजित स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं.यावेळी पंचक्रोशीतील शाळांनी या उपक्रमास उत्सुर्त असा प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे उद्घाटन राजू शंकरराव शिंदे यांनी केलं. या वर्षी २० शाळांचा सहभाग असून ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.   शिंदे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष अनिल फाकटकर आणि उत्सव प्रमुख स्वप्निल गुप्ते यांच्याबरोबर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नेटके आयोजन केले.सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आपले स्पर्धेचे सादरीकरण केले.

यश झोडगे साहिल गुप्ते ॐकार मेढी वैष्णवी आंबेकर शुभम फाकटकर अथर्व कुलकर्णी प्रांजल पंचोली सानिका टकले आर्य मेढी शिवानी कर्वे प्रतीक मेहता आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

स्पर्धेचे  निकाल 
बालवाडी गट
प्रथम क्रमांक पैसाफंड प्राथमिक शाळा
द्वितीय क्रमांक जैन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ आदर्श विद्या मंदिर

पहिली ते चौथी गट
प्रथम क्रमांक सरस्वती विद्यामंदिर
द्वितीय क्रमांक पैसा फंड प्राथमिक शाळा
उत्तेजनार्थ आदर्श विद्या मंदिर

पाचवी ते सातवी गट
प्रथम क्रमांक आदर्श विद्यामंदिर
द्वितीय क्रमांक सरस्वती विद्यामंदिर
उत्तेजनार्थ सिद्धांत स्कूल

मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वतीने विशेष पारितोषिक जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे

स्पर्धेमध्ये श्री सिद्ध गणेश मानचिन्ह बरोबर स्व. बबनराव धर्माजी गरुड यांच्या स्मृतीनिमित्त चषक दिले जातात
वैयक्तिक पारितोषिक
सानवी सांडभोर पैसाफंड प्राथमिक शाळा बालवाडी
नम्रता मोकाशी आदर्श विद्या मंदिर
तानिया कुमारी सिद्धांत स्कूल सुदुंबरे

मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते  दत्तात्रय बळवंत मेढी आणि  सतीश महादेव संभूस कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!