मावळसामाजिक

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेत निमंत्रित संचालक पदे जाहीर.

नियुक्तीचे पत्र पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले व अध्यक्ष विजय शेटे यांनी दिले.

Spread the love

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेत निमंत्रित संचालक पदे जाहीर ; नियुक्तीचे पत्र पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले व अध्यक्ष विजय शेटे यांनी दिले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ सप्टेंबर.

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेत निमंत्रित संचालक म्हणून डॉ. मंगेश दुसाने, संकेत खळदे, विशाल कालेकर, संतोष निघोजकर, राकेश निगडकर व निलेश पारगे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले व अध्यक्ष विजय शेटे यांनी दिले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष राहुल पारगे, डोळसनाथ पतसंस्था हे म्हणाले आपण एखादं कर्ज वाटप करत असताना त्या माणसाची प्रामाणिकपणा आणि नियम बघून काम केले पाहिजे ही शिस्त आम्हाला आदरणीय भेगडे साहेबांनी लावली.

प्रास्ताविक सचिव विनोद टकले यांनी केले,आभार प्रदर्शन मा. अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले याप्रसंगी माजी नगरसेवक सुनिल कारंडे, माजी नगरसेवक रोहित लांघे, पत्रकार सुदेश गिरमे, अमर खळदे, केशव कुल, श्रीधर चव्हाण, मयूर वाघोले, व्यवस्थापिका सुनिता शेंडे, वरिष्ठ लिपिक संजना जाधव, लिपिक गीता ठुबे, वसुली अधिकारी शितल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!