अध्यात्मिकमावळसामाजिक

भगवान महावीर जन्म वाचन निमित्त,साधू साध्वीजींची व्याख्यानमाला संपन्न..

Spread the love

भगवान महावीर जन्म वाचन निमित्त, साधू साध्वीजींचे  व्याख्यानमाला संपन्न..On the occasion of Bhagwan Mahavir birth reading, Sadhu Sadhviji’s lecture series concluded..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ सप्टेंबर.

तळेगाव स्टेशन : भगवान महावीर जन्म वाचन निमित्त पुज्य मुनि हिरसागरजी म.सा. व बाल मुनि वीरभद्र सागरजी म.सा. प्रवचन प्रभावी साध्वीजी नीमवर्षाश्रीजी म.सा. साध्वीजी नेहावर्षाश्रीजी म.सा. साध्वीजी नीतवर्षाश्रीजी म.सा, साध्वीजी भक्तिवर्षाश्रीजी म.सा. साध्वीजी हीववर्षाश्रीजी म.सा. यांच्या सानिध्यात सकाळी (प्रवचन) व्याख्याने संपन्न झाली.

तद्नंतर अष्टमंगल दर्शन 1) दर्पण 2) भद्रासन 3) वर्धमान 4) श्रीवात्स 5) मीनयुगल 6) कलश 7) स्वस्तीक 8) नंदावर्त या अष्टमंगलांचा दर्शन सकल संघाला करण्यात आला. उपाश्रयात केले तसेच त्रिशला माताला जी चौदा स्वप्ने पडली त्या सप्नांना चैन व हार घालून त्यांचे दर्शन व पूजन करण्यात आले. ती चौदा स्वप्ने 1) हाथी 2) ऋषभ 3) केसरी सिंह 4) लक्ष्मी 5) फुलांची माळा 6) चंद्र 7) सूर्य 8) ध्वज 9) कलश 10) पदसरोवर 11) रत्नाकर 12 ) विमान 13 ) रत्नगंजी 14) अग्नीशिखा अशी ही चौदा स्वप्ने व साधू साध्वीजींचे वाचन झाले.

वाचनानंतर प्रभूचा पाळणा, पाळण्यात प्रभूंना ठेऊन त्यांना झुला झुलवून,  पूजा करण्यात आली. तसेच दुपारी भोजनाचा लाभ उपस्थितांनी घेतला व दुपारी, वानप्रस्थ आश्रम, उद्योगथाम कुष्ठरोगपुनर्वसन केंद्र (कुष्ठरोगहीत मुला मुलीना),  संजीवनी बालिका आश्रम (मुली) , आभाळमायेचे आश्राम (आजी आजोबा),  आनंदविसावा आश्रम (आजी आजोबा),  करुगांजली शाळा (मुली) बुंदीचे लाडू व शेव असा प्रसाद वाटण्यात आला.

रात्री आरती मंगलदिवा, अंगी तसेच भक्तीभावनाने जैन भक्तीगीतांनी सारे वातावरण भक्तीमय झाले होते. अशा प्रकारे भगवान महावीर वाचन झाले. यात श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांतोविहार सेवक ग्रुप जैन सकल संघ, जैन महिला मंडळे, नूतन ट्रस्ट मंडळ या सर्वांनी योगदान देऊन जन्मवाचन उत्साहात पार पडले. अशी माहिती श्री शांतीनाथ आदिनाथ जेन सकल संघातर्फे देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!