आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमुळशीसामाजिक

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित-” जी एन एम या”- नर्सिंग कोर्स संपादित विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन- शुभेच्छा सोहळा संपन्न!

Spread the love

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित-” जी एन एम या”- नर्सिंग कोर्स संपादित विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन- शुभेच्छा सोहळा संपन्न !Talegaon General Hospital operated- “GNM Ya”- nursing course edited students’ abhishatchintan- Good luck ceremony concluded!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ नोव्हेंबर.

शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर या दिवशी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रिक्रेशन हॉलमध्ये प्राचार्य मोनालिसा यांनी दीप प्रज्वलनानंतर उपस्थितांचे स्वागत केले. जी एन एम नर्सिंग कोर्सच्या २०२०- २३ या तीन वर्षात आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि सेकंड फर्स्ट वर्षातील विद्यार्थ्यांनी- गायन नृत्य आणि चलत चित्रपटातून संस्थेच्या प्रति असलेल्या आपल्या अप्रतिम भावना व्यक्त केल्या.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असते हा- संदेश आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवातून प्रमुख पाहुणे डॉ शाळीग्राम भंडारींनी अत्यंत संवेदनशील शब्दात नर्सिंग क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणातून देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या अत्यंत देखण्या- प्रसन्न समारंभाचे पूर्ण आयोजन नर्सिंग स्कूलच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन केले.

त्यात खालील गोष्टीचा समावेश होता- उत्कृष्ट फोटोग्राफी- परमेश्वर राठोड, साऊंड सिस्टिम- प्रफुल्ल लोंढे, विद्यार्थी आणि संस्थेविषयी अत्यंत तरल शब्दातील आपली मनोगते सादर केलीत– त्यात भाग घेतला होता- कुमारी विशाखा निकम-  शिवम माने- प्रतीक्षा दौंडे स्नेहा म्हात्रे- आणि धनश्री इताम.

आभार प्रदर्शन- कुमारी श्रुती चव्हाण, समारंभाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन- श्रुती कदम आणि निशिगंधा यांनी केले.  सभागृहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच या समारंभाच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!