अध्यात्मिकमावळ

लोणावळा गणेशोत्सव २०२२ -२३ गणराया अॕवार्ड पुरस्काराचे वितरण..

तुंगार्ली येथील येथील ओमकार मिञ मंडळ प्रथम , तर महाराष्ट्र मातंग समाज मंडळाने दुसरा क्रमांक पटकावला.

Spread the love

लोणावळा गणेशोत्सव २०२२ -२३ गणराया अॕवार्ड पुरस्काराचे वितरण , तुंगार्ली येथील येथील ओमकार मिञ मंडळ प्रथम , तर महाराष्ट्र मातंग समाज मंडळाने दुसरा क्रमांक पटकावला.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १६ सप्टेंबर.

लोणावळा गणेशोत्सव २०२२ -२३ गणराया अॕवार्ड पुरस्काराचे वितरण :तुंगार्ली येथील येथील ओमकार मिञ मंडळ प्रथम , तर महाराष्ट्र मातंग समाज मंडळाने दुसरा क्रमांक पटकावला.

लोणावळा शहर व ग्रामिण पोलिसांकडून गणराया अॕवार्ड २०२२ -२३ चे शांतता कमिटीचे वेळी आयपीएस पोलिस अधिकारी , सहाय्यक पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
यावेळी तिसरा क्रमांक श्रीमंत नेहरू मिञ मंडळाने पटकावला.चवथा क्रमांक श्री तुफान मिञ मंडळ , गावठाण आणि पाचवा क्रमांक खंडाळा येथील संत रोहिदास मिञ मंडळाने पटकावला.

यावेळी हाॕटेल चंद्रलोक येथे आयोजित शांतता कमिटीचेवतीने बैठकीचे आयोजन लोणावळा शहर व ग्रामिण पोलिसांकडून करण्यात आले होते ,
यावेळी प्रमुख पाहुणे आयपीएस आधिकारी सत्यसाई कार्तिक म्हणाले , श्रीगणेशोत्सव महाराष्ट्रात पहिल्यांदाच मला पहायला मिळत असल्याने आनंद आहे.
आपल्या सहकार्याने लोणावळ्यात पावसाळ्यातील पर्यटन नियोजन सुंदर झाले.तसेच नियोजन गणेशोत्सव काळात होणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. आॕब्जेक्शन असणारी घोषणाबाजी , दुसऱ्या समाजाचे व्यक्तींवर गुलाल टाकणे , मद्यपान , नशापान करून धिंगाणा घालणे व डी.जे आणि वाद्यकामाचा ठराविक डेसीबला आवाज नसल्यास तात्काळ मंडळाचे पदाधिकारी यांचेवर गुन्हा दाखल होईल..

लोकमान्य टिळकांनी ज्या मुख्य हेतूने हा उत्सव चालू केला आहे , त्याबाबत पावित्र्य राखले जावे.
मिरवणूक रूटमधे ऐनवेळी बदल , डाॕल्बीच्या वाढत्या भिंती यावरतसेच मद्यविक्रीवर पूर्ण निर्बंध राहील. सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. बेकायदेशीर वर्तन व महिलांची छेडछाड होणार नाही , याची काळजी घ्यावी.
विसर्जन मिरवणूकीसाठी जास्त वेळ लागतो त्यावर बोलताना श्री.सत्यसाई कार्तिक म्हणाले , आम्ही लोकही माणूस आहोत.विसर्जन मिरवणूक संपायला चार वाजतात,मग पोलिसांना घरी जायला उशीर होतो व सकाळीही लवकर ड्युटी वर यावे लागते.भांडण व झगडा करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाईल.

ईद ए मिलाद कार्यक्रमाची मिरवणूक मुस्लीम समाजातर्फे ता.१ रोजी ठेवल्याने त्यांचे आभार.यावेळी पावसायात टोईंग व्हाॕन द्वारेचार पाचशे वाहनांवर कारवाई करण्यात आली.सुमारे पाच लाखांचा दंड वसूल झाला.कार्यक्रमाचे प्रारंभी  गणरायाला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी लोणावळा नगरपदेचे प्रशासकीय आधिकारी पंडीत पाटील , वीज वीतरण कंपनीचे कार्यकारी आभियंता शिवाजी पवार , लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल , लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ , लोणावळा शहर पञकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी ,
तसेच उद्योजक श्री.खन्ना व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक निखिल कविश्वर , राजूशेठ बोराटी , प्रकाशा पोरवाल , आरूण लाड , राजूशेठ चव्हाण , प्रदिप काकडे , पोलिसपाटील संजय जाधव , भरत भरणे , मानाचा पहिला गणपतीचे ट्रस्टचे अध्यक्ष विलासभाऊ बडेकर , जितूभाई टेलर , शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , अनिल कडू , नासिर शेख ,मनिषा बंबोरी , जेष्ट नागरिक संघाचे पांडुरंग तिखे ,जयहिंद मिञ मंडळाचे रामभाऊ दुर्गे , सुपर्णा दिलीप गायकवाड , समीर खोले , विशाल पाडाळे , यांनी प्रश्न मांडले. यावेळी प्रास्ताविक शहर पोलिस स्टेशनचे श्री.डुबल यांनी केले.त्यांनी गणपतीचे मंडपापासून मिरवणुका व विसर्जन याबाबत नियमावली सांगितली. लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक श्री.धुमाळ यांनी मनोगतात कार्लामधे गणेशविसर्जन प्रसंगी पेट्रोलींग व घाटावर स्वयंसेवक नेमणार असे सांगितले .

मुख्याधिकारी तथा प्रशासकीय आधिकारी पंडीत पाटील यांनी प्लँट चालू झाला की , भांगरवाडी व खोंडगेवाडी येथील खराब रस्त्याची कामे करून घेतो. ठेकेदार व आमचे आभियंते यांच्या चुकीमुळे खड्डेमय रस्त्याने नागरिकांना जा ये करावी लागते , त्याबद्दल माफी मागितली. तसेच गर्दीचे ठिकाणी फिरती शौचालये ठेवणार असून याबाबत मागणी करावी , असे सूचवले. वीज कंपनीचे आभियंता श्री.पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले , सोमवारी सर्वांनी आर्ज द्या मीटर उपलब्द करून देतो. तसेच एक ग्रूप व्हाटसअपवर बनवणार आहे.

यावेळी पर्यटकांचे सोयीसाठी काम केल्या श्रावणी कामत , भरत भरणे , पोलिसपाटील संजय जाधव , राहुल आंबेकर आदी पन्नास लोकांना प्रशस्तिपञके व टी शर्ट देवून श्री.कार्तिक साहेब यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
सूञसंचालन बाप्पूलाल तारे यांनी केले.आभार किशोर धुमाळ यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!