ताज्या घडामोडी

मुंडे स्पोर्ट्सचे आव्हान कायम क्रिकेट इन्स्टिट्युशन ऑफ डोंबिवली क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

डोंबिवली : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांनीही तेवढीच तोलामोलाची साथ दिल्यामुळे मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लब संघाने आरसीसी नवीमुंबई संघाचा ४३ धावांनी पराभव करत क्रिकेट इन्स्टिट्युशन ऑफ डोंबिवली आयोजित डोंबिवली टी -२०लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

निळजे येथील संत मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या फलंदाजांनी २० षटकात ६ बाद २१६ धावा उभारुन प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. विशाल रंगलानीने २१ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ यश जाधवने २३ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार ठोकत ४८ धावा केल्या. अरमान शेखने संघाच्या धावसंख्येत ४७ धावांची भर टाकली. रवी विश्वकर्मा आणि स्वप्निल राऊळने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. पॅकी आणि रोशन आडेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना रवी विश्वकर्मा आणि शुभम पुण्यर्थीने पहिल्या विकेट्साठी ७० धावांची भागीदारी करत आरसीसी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण रवी २३ धावांवर बाद झाल्यावर शुभम आणि अंकुर सिंगचा अपवाद वगळता इतरांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. आरसीसी संघाचा डाव १८.४ षटकात १७३ आटोपला. शुभमने २३ चेंडूत ४५ धावा करताना आठ चौकार आणि दोन षटकार मारले. अंकुर सिंगने ३० धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या यश दुबेने ३८ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. निपुण पांचाळ, हार्दिक कुरणगळे आणि पुष्कराज चौहानने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : मुंडे स्पोर्ट्स क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद २१६ ( अरमान शेख ४७, विशाल रंगलानी ५२, यश जाधव ४८, रवी विश्वकर्मा ४-०-२७-२, स्वप्निल राऊळ ४-०-२३-२, पॅकी ४-४९-१, रोशन आडे २-२९-१) विजयी विरुद्ध आरसीसी नवीमुंबई : १८.४ षटकात सर्वबाद १७३ ( रवी विश्वकर्मा २३, शुभम पुण्यार्थी ४५, अंकुर सिंग ३०, यश दुबे ४-३४-३, निपुण पांचाळ ३-४०-२, हार्दिक कुरणगळ ३.४- २६-२, पुष्कराज चौहान ४-३२-२). सामनावीर : यश दुबे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!