रविवारी विश्वास व विराज उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या घरातील महिलांसाठी स्नेहमेळावा – सौ.साधना पाटील.
शिराळा प्रतिनिधी : रविवारी (ता. 1 मे) महाराष्ट्र दिन व कामगार दीनाचे औचित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिराळा सखी मंच यांचे संयुक्त विद्यमाने विश्वास साखर कारखाना व विराज उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या घरातील महिला भगिनींसाठी स्नेहमेळावा व विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही माहिती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. साधना पाटील यांनी दिली.
सौ. नाईक म्हणाल्या, आमदार मानसिंगभाऊ नाईक, आपला बझारच्या अध्यक्ष सौ. सुनीतादेवी नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनीताई नाईक, सौ. मनिषाताई नाईक, श्रीमती रंजनाताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम चिखली येथील चिंतन मंडप येथे रविवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. त्यामध्ये विविधगुण दर्शन स्पर्धेत नृत्य गायन, वक्तृत्व, अभिनय, संगीत खुर्ची अशा महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजन आहे. कर्मचारी वर्ग व त्याचे कुटुंबीय हा प्रत्येक उद्योग समूहाचा कणा मानला जातो. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने कामगार वर्गाशी ऋणानुबंध अधिक दृढ होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.