क्रीडा व मनोरंजनमावळ

रोटरी सिटीतर्फे महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी, साक्षी डायग्नोस्टिक, कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र तळेगाव दाभाडे यांचे संयुक्त विद्यमाने येथील सुशीला मंगल कार्यालयात टू व्हीलर प्रशिक्षण वर्गाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

Spread the love

रोटरी सिटीतर्फे महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ संपन्न..Two wheeler training class for women inaugurated by Rotary City..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ ऑगष्ट.

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी, साक्षी डायग्नोस्टिक, कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र तळेगाव दाभाडे यांचे संयुक्त विद्यमाने येथील सुशीला मंगल कार्यालयात टू व्हीलर प्रशिक्षण वर्गाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. पंचक्रोशीतील २०० महिलांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला असून हा वर्ग १० दिवस चालणार आहे.

कार्यक्रमासाठी सहभागी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, महिला भगिनींना छोट्या मोठ्या कामासाठी, मुलांना शाळा कॉलेजमध्ये सोडण्यासाठी, बाजारातून वस्तू आणणे, तातडीने येण्या जाण्यासाठी, ऑफिस व कामाला जाण्यासाठी टू व्हीलर चालवता येणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन या तीनही संस्थांनी हे प्रशिक्षण शिबिर घेतल्याचे अध्यक्ष. सुरेश शेंडे यांनी विशद केले तर महिला सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी सिटीबरोबर साक्षी डायग्नोस्टिक काम करणार असल्याचे प्रतिपादन किरण किल्लावाला यांनी केले, शितल जाधव, गौरव ढोकलिया प्रकल्प प्रमुख हरिश्चंद्र गडसिंग,रितेश फाकटकर, यांनी टू व्हीलर प्रशिक्षणाचे महत्त्व, आवश्यकता,शासकीय नियम इत्यादी महत्त्व आपल्या मनोगताद्वारे विशद केले.संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, ब्रिजेंद्र किल्लावाला, अंबरचे संपादक अतुल पवार, स्मिता कांबळे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या.

 

प्रशिक्षण वर्गात सहभागी महिलांना साक्षी डायग्नोस्टिक तर्फे प्रत्येकी एक छत्री देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटी चे माजी अध्यक्ष संतोष शेळके यांनी करताना रोटरी सिटीच्या कामाचा आढावा घेतला रोटरी सिटी पंचक्रोशीत करत असलेल्या सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य विषयक, पर्यावरण पूरक विविध अंगी उपक्रमांची माहिती शेळके यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे व संगीता शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले.

संतोष परदेशी, प्रसाद पादीर,शरयू देवळे, सुनील महाजन,रघुनाथ कश्यप,आनंद पूर्णपात्रे, बसप्पा भंडारी,रामनाथ कलावडे, प्रशांत ताये, रितेश फाकटकर, इत्यादी रोटरी मेंबर्स साक्षी डायग्नोस्टिकचे पदाधिकारी, कर्मयोगी व्यावसायिक केंद्राचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!