ताज्या घडामोडी

शिराळा तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची बैठक सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : आज येथील तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची बैठक पार पडली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ प्रमुख उपस्थितीत होते. बैठकीत आमदार मानसिंगभाऊ यांनी विशेष:तहा पाणी टंचाई, स्मार्ट स्कूल, पावसाळ्याच्या तोंडावर पशुंचे लसीकरण, नवीन अंगवाडी बांधकाम, कमी क्षमतचे विजेचे ट्रान्सफार्मर तातडीने बदलणे, ज्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवायचे आहे तेथे 100 किलोवॅट पेक्षा कमी न बसवणे, जलजिवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा, कोरोनावरील बुस्टर डोसचे लसीकरण स्थिती, खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोई-सुवीधा, नियोजन, खते व बियांणाची उपलब्धता आदीचा सवीस्तर आढावा घेतला. काळुंदे योजनेतून खराळे व चिंचेवाडीस तातडीने पाणी द्यावे, अशा सूचना कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांना दिल्या. बांधकाम विभागाकडील सुरू असलेली कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी संपवावीत आदी आवश्यकत्या सूचना सर्व विभागांना केल्या. यावेळी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!