क्रीडा व मनोरंजन

लायन्स क्लब आयोजित कुमार-मुली व व्यावसायिक जिल्हाअजिंक्यपद खो खो स्पर्धा

Spread the love

कुमारांचे अजिंक्यपद विद्यार्थीला तर मुलींचे अजिंक्यपद ओम साईश्वरला

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

दि.२५ मे, (क्री. प्र.) लायन्स क्लब ऑफ माहीम आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एलिट या दोन संस्थांतर्फे आयोजित केलेल्या कुमार-मुली व व्यवसायिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेची आज सांगता झाली. लायनीस्टिक डिस्ट्रिक्ट ३२३१ए१ चे १ वाईस डिस्टिक गव्हर्नर (ईलेक्ट) व मुंबईचे माजी शेरिफ डॉ. जगन्नाथ राव हेगडे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब माहिमचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई एलिटचे मोहन वायदंडे हे खास करून उपस्थित होते. आज झालेल्या अंतिम सामन्यात कुमार गटात विद्यार्थी क्रीडा केंद्र, परळने तर मुली गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने अजिंक्यपदाची बाजी मारली.

मुली गटाच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा ७-६ (मध्यंतर ७-४) असा १ डाव व १ गुणाने पराभव केला. ओम साईश्वर तर्फे वैष्णवी परबने २:१०, ६:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. अथश्री तेरवणकरने ३:१०, नाबाद १ मिनिट संरक्षण केले. ईशाली आंब्रेने २:३०, १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. धृती राऊळने ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. स्पूर्ती चंदुरकरने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले.

कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र ‘अ’ संघाने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा ११-७ (मध्यंतर ११-३) असा १ डाव व ४ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी तर्फे हर्ष कामतेकरने ३ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. प्रतिक घाणेकरने ४ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. भावेश बनेने आक्रमणात ३ गडी बाद केले. श्री समर्थ तर्फे विशाल खाकेने ३, १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. हितेश आग्रेने १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले.

मुली गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात आर्य सेनेने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा ३-२ असा १ गुण व ३० सेकंद राखून पराभव केला.

कुमार गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने अमर हिंद मंडळाचा १२-०३ असा ९ गुणांनी पराभव केला.

मुली गट व कुमार गट उत्कृष्ट खेळाडू.

सर्वोत्कृष्ट संरक्षक :- अथश्री तेरवणकर (ओम साईश्वर), विशाल खाके (श्री समर्थ)

सर्वोत्कृष्ट आक्रमक :- स्पूती चंदूलकर (वैभव), हर्ष कामतेकर (विद्यार्थी)

अष्टपैलू – वैष्णवी परब (ओम साईश्वर), प्रतिक घाणेकर (विद्यार्थी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!