ताज्या घडामोडी

मालती कन्या महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Spread the love

विद्यार्थिनींना यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य जाणून घेऊन त्यांचा आदर्श घ्यावा. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द, आत्मविश्वास व रयतेवरील प्रेम हे त्यांच्या यशस्वी स्वराज्याचे गमक होते “असे प्रतिपादन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले. ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या शिवस्वराज्य दिन या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले,” ६ जून १६७४ रोजी शिवराय छत्रपती झाले, प्रत्येक मावळ्याला कुणब्याला, बलुतेदार शूद्रातिशूद्र व मुस्लिमांना आपणच राजे झालो असा अत्यानंद झाला. समस्त रयतेला इतका आनंद इतिहासात कधीच झाला नव्हता.
हे राज्य रयतेचे आहे. अठरापगड जातींनी मिळून घाम व रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे. त्यामुळे स्वराज्यात जाती-धर्माला थारा नव्हता.” अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहास विभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते .त्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शिवचरित्र उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले,”शिवाजी महाराजांना स्त्रियांच्या विषयी प्रचंड आदर होता तसेच अनेक शिलेदार मावळे यांच्या प्रयत्नातून एक यशस्वी स्वराज्याची स्थापना करून दाखविणारे राजे म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे शिवरायांनी रयतेच्या अंगी असणारे गुण हेरले हेच त्यांच्या यशाचे रहस्य असल्याचे दिसून येते” .
यावेळी प्रा.डॉ.वृषाली पाटील, प्रा.डॉ स्नेहल हेगिष्टे तसेच श्रीकांत जाधव, प्रा.डॉ.अशोक मरळे, प्रा.डॉ.वर्षा पाटील , प्रा.डॉ.मेघा पाटील , प्रा.डॉ.संजीवनी पाटील यावेळी उपस्थित होते. या वेळी दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेचे पूजनप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कु. किरण मुसळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. योगिता कोळी यांनी केले. कु. आरती नागवेकर व स्वप्नाली जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु.संध्या सपकाळ यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!