ताज्या घडामोडी

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिर.

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी) : आमदार मानसिंगराव वाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानांतर्गत अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी तातडीने प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात १५ जून रोजी व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात २६ जून रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ तालुक्यातील अपंग व दिव्यांग लोकांनी घ्यावा. ही माहिती अभियानाचे मुख्य प्रवर्तक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, या शिबिरात अपंग व दिव्यांगांची तपासणी करुन तेथेच प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली आहे. बुधवार, दि. १५ जून २०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय, शिराळा येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिबिर होईल, तर बुधवार, दि. २२ जून २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय, कोकरूड येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिबीराचे कामकाज होईल. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज, आधार कार्ड कलर झेरॉक्स, रेशन कार्ड कलर झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडलेचा दाखला सोबत आणावा.
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, दर वर्षी शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मानसिंगभाऊ नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिर त्याचाच भाग आहे.
————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!