ताज्या घडामोडी
मांगरूळ येथे नालंदा अभ्यासकेंद्रात नागरी सत्कार व ज्ञानशांती अभ्यासिका उदघाटन
शिराळा प्रतिनिधी / मांगरूळ (ता. शिराळा) : येथील नालंदा अभ्यास केंद्रात नागरी सत्कार व ज्ञानशांती अभ्यासिका उदघाटन समारंभ पार पडला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजी विद्यापीठाचे वित्त अधिकारी मा. अभिजित चौगुले, सिंधुदुर्गचे उप विभागीय पोलीस अधिकारी दीपक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उप शिक्षणाधिकारी अभिजित कुंभार, रोहित शिंदे (इन्फोसिस प्लेसल्मेट), अक्षय मस्के (ठाणे पोलीस) यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संग्राम पाटील, कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, कृष्णा शिंदे, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, नामदेव शेणवी, योगेश शिंदे, मिलींद पाटील, अभिजीत मस्के आदी उपस्थित होते.