आरोग्य व शिक्षण

पावसच्या स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये छ.राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

पावस :- रत्नागिरी तालुक्यातील पावसच्या स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर प्रशालेमध्ये लोककल्याणकारी छ.राजर्षी शाहू महाराज यांची १४८ वी. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कलाविहार मंडळाचे सभापती श्री व्ही बी काटे यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर मुख्याध्यापिका सौ प्रिया गावडे व पर्यवेक्षक श्री बी. बी. माने तसेच श्री व्ही. डी.पाटील यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केली.त्यानंतर गणित विषय शिक्षिका सौ श्रेया चिले यांनी
आभार माणुन कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!