ताज्या घडामोडी

शेडगेवाडी मोफत आरोग्य शिबिरात 350 रुग्णांची तपासणी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शेडगेवाडी (ता. शिराळा)येथे मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान व राष्ट्रवादी डॉक्टर सेल मार्फत शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात एकूण 350 रुग्णांची तपासणी झाली. एकुणच या शिबिराला उत्फूर्द प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक व सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. एकूण 350 रुग्णांपैकी 150 रुग्णांचा इ.सी.जी. काढून लिपिड प्रोफाइल व थायरॉईड ची मोफत तपासणी करण्यात आली. 100 रुग्णांची डोळे तपासणी करून नंबरचे चष्मे ही देण्यात आले. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टरांकडे 50 लोकांची तपासणी झाली. सदर रुग्णांना सवलतीच्या दरात पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मानसिंगभाऊ लोकल्याण अभियानाचे स्वयंसेवक व राष्ट्रवादी डॉक्टर कडून डॉ. तानाजी पाटील, डॉ. शैलेश माने, डॉ. अजित पाटील व सर्व डॉक्टर सेलचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!