ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना जनरल मॅनेजर व प्रभारी कार्यकारी संचालकपदी अमोल पाटील.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या जनरल मॅनेंजर (फायनान्स) व प्रभारी कार्यकारी संचालकपदी श्री. अमोल अशोक पाटील (सांगली) यांची निवड करण्यात आली. आज श्री. पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व कारखान्याचे संचालक विराज नाईक यांची भेट घेतली. आमदार नाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे व्यवस्थापन निट नेटके ठेवून संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कर्मचारी आदी घटकांचा योग्य समन्वय ठेवून कामकाज करावे, अशी सूचना केली. त्यानंतर श्री. पाटील यांनी कारखाना स्थळावरील लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक व कै. विश्वासराव नाईक यांच्या पुतळ्यास वंदन करून पदभार स्विकारला. प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी त्यांचे स्वागत करून पदभार सोपविला. यावेळी सचिव सचिन पाटील, अरुण साळुंखे, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख्, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!