आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

कोथुर्णे गावातील बेपत्ता बालिकेचा शाळे मागे दुर्दैवी मृत्यू..

दुर्दैवी मृत्यू झाल्याचे व तिचा मृतदेह आज दुपारी एकच्या सुमारास शाळेमागे झुडपामधे मिळाल्याने गावात खळबळ माजली .

Spread the love

कोथुर्णे गावातील बेपत्ता बालिकेचा शाळे मागे दुर्दैवी मृत्यू..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.३ प्रतिनिधी 

कोथुर्णे गावातील कु.स्वरा जनार्धन चांदेकर (वय-७) या बालिकेचा काल ता.२ दुपारपासून सर्वञ शोध सुरू होता. ती दुपारी दीड ते दोन पासून बेपत्ता झाली होती , तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे व तिचा मृतदेह आज दुपारी एकच्या सुमारास शाळेमागे झुडपामधे मिळाल्याने गावात खळबळ माजली .

नागपंचमी निमित्ताने शाळेला सुट्टी असल्याने कु.स्वरा ही मंदिराजवळ खेळत असता ; आचानक बेपत्ता झाली. सोशल मिडियाद्वारे या हरवलेल्या मुलीबद्दल सर्वग्रूपवर मेसेज गेले. तरीही ती सुमारे चोवीस तास सापडली नाही. आज शाळेच्या मागे आसलेल्या गवत , अळवाची पाने यामधे तिचा मृतदेह पोलिस व ग्रामस्थांना आढळला,असे विश्वसनीय सुञांकडून समजले.

काल दुपारी या बालिकेच्या बेपत्ता होण्याचे वेळेत गावात तीन चार ब्लँकेटवाले , एक भंगारवाला आणि चटईवाले तसेच आणखी फेरीवाले आले होते , कुणीतरी मुलीला पळवून नेली , आसा काहींनी सोशल मिडीयावरून भीती व्यक्त केली होती. याबाबत कामशेतचे पोलिसनिरिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सखोल तपासा नंतर सत्य समोर येईल . या बालिकेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!