ताज्या घडामोडी

पाच गव्यांच्या हत्येचा निषेध…

Spread the love

शिराळा प्रतिनिधी –
शिराळा तालुक्यातील रिळे गावच्या हद्दीतील पाच गव्यांची विषबाधा करून हत्या करण्यात आली.
या भ्याड कृत्याचा सांगली जिल्ह्यातील सर्व प्राणी मित्र संघटनांनी आणि पर्यावरण प्रेमींनी निषेध केला आहे.
या संघटनांमध्ये इन्साफ फाउंडेशन, प्लॅनेट अर्थ फाउंडेशन, नेचर कन्सर्वेशन सोसायटी, हरित सेना, जैवविविधता मंडळ, जायंट ग्रुप, डॉल्फिन नेचर ग्रुप, आभाळमाया फाउंडेशन, पीपल फॉर अनिमल, अनिमल राहत, आनिमल सहारा फाउंडेशन, रिव्हर व्हॅली एक्सपिडीशण अँड रिसर्च इत्यादींचा समावेश आहे.
गव्याची हत्या करणाऱ्या रिळे गाव परिसरातील आरोपींना कठोर शासन मिळावे आणि परत कोण असे धाडस करणार नाही यासाठी प्रयत्न करावेत मागणी जोर करत आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका हा जैवविविधता च्या बाबतीत विपुल होता. परंतु गेल्या काही वर्षात मानव वन्यप्राणी संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
लोकांकडून होणारी वृक्षतोड , जमिनीचा बदललेला वापर आणि डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे जंगलातील खाद्य संपत आहे.वनविभागाकडून आणि विविध एनजीओ कडून जनजागृती करून सुद्धा लोक शिकार, वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत.यामुळे गेल्या पंचवीस -तीस वर्षात लोकांनी केलेल्या पर्यावरण बदलामुळे मानव वन्य प्राणी संघर्ष भोगावा लागत आहे.
जर लोकांना वन्य प्राणी संघर्ष कमी करायचा असेल, तर निसर्गावर होणारे अतिक्रमण थांबवले पाहिजे.
यामध्ये जंगलतोड थांबवणे, वृक्षतोड थांबवणे, वेगवेगळ्या दगडांच्या खाणी, बंद करणे, गरज नसताना नवीन रस्ते आणि विकास कामे थांबवणे गरजेचे आहे.
माणूस हा निसर्गाचा भाग असल्यामुळे त्याला वन्यप्राण्यांशिवाय जगणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच मानव आणि वन्यप्राणी सहजीवन स्वीकारले पाहिजे.
त्याबरोबरच गेल्या काही वर्षात चांदोली अभयारण्याला कुंपण घालावे, बिबट्यांना पकडून जंगलात सोडावे, अन्नसाखळी कमकुवत होत आहे अश्या चुकीच्या मागण्या जोर धरत आहेत.
स्थानिक पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी चुकीच्या मागण्या करण्यापेक्षा, ग्रामस्थांना त्यांच्या सवयीत बदल करण्यास सांगणे गरजेचे आहे देशातील विविध भागात लोकांनी वन्य प्राण्यांसोबत चे जीवन स्वीकारले आहे. वन्य प्राण्यांसोबत चे जीवन स्वीकारत असताना इको टुरिझम, गवा पर्यटन, बिबट्या पर्यटन, जंगल पर्यटन, वनराई पर्यटन इत्यादी विविध प्रकारच्या संकल्पनातून ग्रामपंचायत निधी उभा राहू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!