आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

तळेगाव दाभाडे येथे, प्रथमच अंगणवाडीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन ही संस्था तळेगाव मध्ये एकूण वीस अंगणवाडीमध्ये चाइल्ड फ्रेंडली अंगणवाडी हा प्रोजेक्ट राबवत आहे.

Spread the love

तळेगाव दाभाडे येथे प्रथमच अंगणवाडीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर,२३ फेब्रुवारी.Annual Snehasamelan Samela was held for the first time in Anganwadi at Talegaon Dabhade.

होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन ही संस्था तळेगाव मध्ये एकूण वीस अंगणवाडीमध्ये चाइल्ड फ्रेंडली अंगणवाडी हा प्रोजेक्ट राबवत आहे .याशिवाय तळेगाव मधील नगरपालिकेच्या एकूण सात शाळांमध्ये शिक्षा की आशा हा प्रोजेक्ट गेल्या सात वर्षापासून संस्था राबवत आहे.

या संस्थेअंतर्गत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी अंगणवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर कॅरोलीन, प्रोजेक्ट मॅनेजर मारिया तसेच अंकिता, सी. डी. पी. ओ. तेलेसर , सी डी पी ओ सुहीता , अंगणवाडी सुपरवायझर पद्मजा काळे, उपमुख्याधिकारी, सुप्रिया शिंदे, PSI-. शरद सर तळेगाव पोलीस स्टेशन,रेश्मा फडतरे, वीणा करंडे उपस्थित होत्या.

 

प्रथम संस्थेच्या संस्थापिका कॅरोलिन यांचे मनोगत झाले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. व नंतर मुलांचे अंगणवाडीनुसार डान्स परफॉर्मन्स झाले. त्यानंतर सीडीपीओ तेलेसर, तसेच सी डी पी ओ सुहीता यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सुहीता  व तेलेसर यांनी संस्था अंगणवाडी सोबत करत असलेल्या कामाचा मुलांना फायदा होत असल्याचे सांगितले. व मुलांमध्ये चांगले बदल दिसून येत आहेत असे देखील सांगितले. तसेच संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

प्रथमच अंगणवाडीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झाले त्यामुळे अंगणवाडी शिक्षिका ,मुले ,पालक यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षा की आशाचे टीचर्स सोफिया तसेच आरती जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!