महाराष्ट्र

भोई प्रतिष्ठानचे पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन

Spread the love

पुणे : सातारा पूरग्रस्त भागातील बांधवांच्या मदत कार्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान चे मदत पथक रवाना होत असून सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात हे पथक कार्यरत राहणार आहे.पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

या परिसरातील मीर गाव अणि पंचक्रोशीत दरड कोसळून अनेक बांधव मृत्युमुखी पडले असून अनेक जण बेपत्ता आहेत.
वाचलेल्या बांधवाना कोयना नगर येथील शाळेत तात्पुरत्या निवासात ठेवले आहे. अचानक आलेल्या या संकटाचा सामना करताना येथील बांधवाना भावनिक, मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांना वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्या साठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानमार्फत चे वैद्यकीय मदत पथक मंगळवार 27 जुलै रोजी कोयनानगर ला जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि N.D.R.F. टीम यांच्या समन्वयातून हे पथक कार्यरत राहणार आहे.

आपत्ती गस्त बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी पुणेकरांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन या टीम चे प्रमुख आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी केले आहे.

 

(आवश्यक वस्तू- कपडे, कोरडे खाद्य पदार्थ, साबण,टूथपेस्ट, तेल, sanitory pads, पिण्याचे पाणी, oushadhe,ड्रेसिंग साहित्य, oushadhe रेन कोट, छत्री, टॉर्च.)
मदत साठी संपर्क_ 9822621556, 99215754499,9923406981,9850992233, 9822042600, 8087995662

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!