आरोग्य व शिक्षण

मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना वडिलांनीही गमावला जीव;तिघांचा मृत्यू

Spread the love

कामशेत : येथील कुसगाव खुर्द मध्ये धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या मुलांना खाणीत बुडताना वडिलांनी पाहिले. त्यावेळी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वडिलांनीही जीव गमावला आहे.

पिराजी गणपत सुळे (वय ४५), साई पिराजी सुळे (वय १४), सचिन पीराजी सुळे (वय १२) सर्व रा. इंद्रायणी कॉलनी कामशेत यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी पिराजी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथे धबधबे पाहण्यासाठी केले होते. धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या जागी पाण्याचे डबके साचले होते. या डबक्यात दोन्ही मुले बुडू लागल्याचे पाहून पिराजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.मात्र दुर्दैवाने मुलांसह पिराजी यांनाही पाण्यात बुडाल्याने जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!