आरोग्य व शिक्षण

रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठा सजल्या

Spread the love

तळेगाव : भाऊ – बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव असणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत.

राखी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. खडे असलेल्या, गोंड्याच्या राख्यांना महिलावर्गाची जास्त पसंती मिळत आहे. राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू आहे.

गतवर्षी कोरोना निर्बंधांमुळे माहेरी जाऊन राखी पौर्णिमेचा सण साजरा करणे काहींना शक्य झाले नाही. यावर्षी मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!