आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

पीएमआरडीएच्या वतीने विकास आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी वडगावात सुविधा केंद्र

Spread the love

वडगाव : येथे पीएमआरडीएच्या वतीने प्रारूप विकास आराखड्याला असणार्‍या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

पीएमआरडीएने मावळ तालुक्यातील विकास आराखडा 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध केला आहे. या आराखड्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

आराखड्या संबंधात असणार्‍या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयातील सुविधा केंद्रात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या केंद्रात शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आराखड्याला असणाऱ्या हरकती व सूचना नोंदवाव्या. यासाठी कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नसून उपलब्ध अर्जात गाव व गट नंबरचा उल्लेख करून हरकती दिलेल्या मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन पीएमआरडीएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!