आरोग्य व शिक्षण

एमआयडीसी प्रशासन अडकलय खाजगी फायबर केबल चालकांच्या जाळ्यात

Spread the love

आंबी : तळेगाव एमआयडीसी मध्ये स्ट्रीट लाईटचे खांब हायपरटेंशनचे टॉवर, ट्रान्सफॉर्मर यांचा वापर फायबर केबल साठी केला जात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आवाज न्यूजने दिले होते.

स्ट्रीट लाईटच्या खांबांना लटकत नेलेली केबल त्यासाठी आधी हायपरटेन्शन आणि ट्रांसफार्मर चा घेतलेला आधार पुराव्यासह मांडले होते. काही ठिकाणी या केबल सैल पडल्याने खालपर्यंत लटकत आहेत. तर काही ठिकाणी तुटलेल्या केबल रस्त्यावर लोळण घेत आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. संभाव्य धोका निदर्शनास आणून देत आवाज न्युज युट्यूब चॅनेलने बातमी प्रसारित केली होती.

केबल साठी या खांबांचा वापर करताना परवानगी घेण्यात आली आहे का? परवानगी असल्यास त्यासाठी काही नियमांची आखणी केली आहे का? आणि जर रीतसर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे केबल टाकल्या असल्यास त्यावर कारवाई का होत नाही? या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला असता प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनास आले. आमच्याकडे फक्त विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी आहे दुरुस्ती एमआयडीसीकडे असल्याचे सांगत महावितरणने सुरूवातीलाच हातवर केले. तर आम्ही एमआयडीसीतील कार्यालयांमध्ये भेट दिली असता प्रत्येक व्यक्ती आपल्याला याविषयी माहिती नाही असे सांगून संबंधित अधिकारी आठ- पंधरा दिवसाततून एकदा कधीतरी येतात. त्यांचे नाव- नंबर माहित नाही. नवीन अधिकारी आल्याने सांगता येणार नाही अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.

तुमचे म्हणणे रास्त आहे. आम्ही बातमी पाहिली योग्य मुद्दे मांडले आहेत अशाही प्रतिक्रिया मिळाल्या.

लाईटची कामे करत असताना या केबलचा त्रास होत असल्याचेही एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु कॅमेरासमोर बोलण्यास किंवा सहकार्य करण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्वांवर कोणाचा दबाव आहे का? या फायबर केबल मालका सोबत एमआयडीसी अधिकारी आणि संबंधित विभागाचे कर्मचारी यांचे हितसंबंध आहेत का ? यामुळे धोका दिसत असताना निदर्शनास आणून दिल्यावर ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .या खाजगी केबल चालकांवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे?असा प्रश्न उपस्थित होतोय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!