आरोग्य व शिक्षण

चिंचवड मधील अदिती कटारेची उत्तुंग गगन भरारी

भारतीय वायू दलात अदितीची निवड

Spread the love

चिंचवड : येथील अदिती कटारे (वय 23 ) या तरुणीची भारतीय वायू दलात टेक्निकल आणि फ्लाईंग विभागात निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एएफसीएटीच्या परीक्षेमध्ये देशातून 240 जणांची निवड झाली. त्यात अदितीचा समावेश आहे. या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले आहे.

अदिती कटारे कमलनयन बजाज या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण तिने डॉ. डी वाय पाटील ज्युनियर कॉलेजमधून घेतले आहे. व्ही आय. टी कॉलेज मधून तिने कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची पदवी जून 2019 मध्ये मिळवली आहे. गेली दोन वर्ष ती बार्कले बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम करीत आहे.

अभ्यासाबरोबरच अदिती बास्केटबॉल, लॉन टेनिस आणि बॅडमिंटन या खेळात निपुण आहे.तसेच तीला वाचनाची आवड व पेंटिंगचा छंद आहे.

शाळेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कर्नल प्रकाश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, कठीण परिश्रम करत अदितीने वायुसेनेत जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. या यशाबद्दल अदिती व तिच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!