आरोग्य व शिक्षण

शेतकऱ्यांना ञास होईल असे आरक्षण पीएमआरडीएने टाकल्यास ते अन्यायकारक – खासदार श्रीरंग आप्पा बारणे

Spread the love

लोणावळा : शेतकऱ्यांना ञास होईल असे आरक्षण पीएमआरडीए ने टाकल्यास ते अन्यायकारक आहे. सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा व घरावरून जाणारा रस्ता , शेती झोन ऐवजी वनखाते , रहिवासी झोनऐवजी शेती झोन , असे शेतकऱ्यांना ञास देणारे झोन तसेच पूररेषा तीस ऐवजी दोन हजार मीटरवर लांब असे आरक्षण काढून टाकण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहीन, असे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भाषणात सांगितले .

पीएमआरडीएने टाकलेल्या आरक्षणाचे विरोधात श्री एकविरा कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे बोलत होते.यावेळी खासदार श्री बारणे यांना यावेळी श्री एकविरा कृती समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

.बारणे पुढे म्हणाले , शेतातून रस्ते काढले ते चुकीचे असून इंद्रायणीनदी मधील पूररेषा शेतकऱ्यांना ञासदायक असून त्याबाबत तक्रारी आहेत, सात वर्षे मी पवनाधरणाचे आतील गाळ काढीत असून तो रॉयल्टी न भरता नेता येत असल्याने या इंद्रायणीनदी तील गाळ काढला ;तर ती पूररेषा कमी होईल , रहिवासी झोन चा ग्रीन झोन व ग्रीनचा रहिवासी व फॉरेस्ट झोन केला आहे ,ते चुकीचे आरक्षण रद्द केले पाहिजे ,यासाठी वृत्तपत्रे आणि आंदोलने यातून सरकारच्या कानावर जाईल . हरकतीचे आर्ज केल्यास मला व आमदार यांनाही प्रत द्या. या आंदोलनात जर राजकारण आले तर त्यामुळे संघटना कमकुवत होईल,त्याचा प्रशासन गैरफायदा घेईल, त्यांना वठणीवर आणायचे काम आपण करू.पूररेषा व बदललेले झोन तसेच शेतातून जाणारे रस्ते याबाबत विरोध करू. हरकत घ्या. अर्ज चुकले तर दुरूस्त करून घ्या, असे ते म्हणाले .

यावेळी श्री एकविरा कृती समिती पदाधिकारी व माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे म्हणाले, या मावळात या कृती समितीच्या माध्यमातून पीएमआरडीए ने शेतकऱ्यांच्या शेतातून व घरावरून चुकीचे रस्ते , तसेच रहिवासी झोनचे ग्रीन झोन आणि आर झोनचे ग्रीन झोन तसेच इंद्रायणीनदी ची पूररेषा शेतकऱ्यांना बाधा पोचविणारी आहे.या मावळात पाऊण टक्के जमिन एमआयडीसीत गेली असून विकासाचे महाद्वार आसलेल्या या मावळातून एक्सप्रेस वे व जुना हायवे , रेल्वे गेली. पेट्रोल आणि गॕसची लाईन गेली.तसेच १२ धरणामधे २४३ गावे विस्थापित झाली आहेत, टाटाचे पाणी मुंबईला वीजपुरवठ्यासाठी जाते. पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवडला जाते. पीएमआरडीए चे आरक्षण चुकीचे असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असून या विरोधात ता.८ सप्टेंबर रोजी कार्लाफाटा येथे रास्तारोको करण्याचा इशारा देत असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसह या आंदोलनात सहभागी व्हावे , धनिकांना सोयीचा व अल्पभुधारक शेतकरी यांना भुमिहीन करणारे आरक्षण काढून टाका.मुख्यमंत्री निश्चित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतील, आप्पा आम्ही खूप खासदार पाहिलेत ;पण जमिनीवर बसणारे आपल्यासासारखे एकच खासदार मावळचे खरे भूमिपुञ शोभून दिसता! असे श्री .भाईभरत मोरे यांनी गौरवउद्गार काढले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरदराव हुलावळे म्हणाले , आनेक गावातील शेतकऱ्याने शेतातून रस्ते काढले आहेत.तसेच पूररेषा वाढविली आहे. चुकीची पूररेषा कमी करण्यासाठी डोंगरगाव ते पाथरगाव अनेक भागात बंधारे बांधले व नदीतील गाळ काढला तर पूररेषा कमी होईल. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यावर न्याय देतील.

शेतकरी सुदाम हुलावळे म्हणाले ,सरपंच व सदस्य यांनी याबाबत ठराव करून तो पाठवावा , पीएमआरडीए यावर मार्ग काढतील.
गुरव समाज जिल्हाध्यक्ष शंकरराव शिर्के म्हणाले , या चुकीचे आरक्षण विरोधात जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा ,एमआयडीसी घालवली तसेच आरक्षण ही घालवू.

भाजेचे माजी सरपंच नंदकुमार पदमुले म्हणाले , पूररेषा नसताना दोनशे ते दोनहजार मीटरवर दाखविली.व सर्विस रस्ते असूनही ते गेल्या वीस वर्षात सरकारने केले नाहीत, पण शेतकऱ्यांना ञासदायक शेतीत रस्ते व झोन चुकीचे टाकले आहेत.
प्रशतीशील शेतकरी संतोष राऊत म्हणाले , आमचे १०० गुंठ्यात बगीचा झोन व गावाचे गायरान टुरिस्ट झोन दाखवला.चुकीचे आरक्षण विरूद्ध सर्वांनी लढा द्यावा.वाकसई ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच दिपक काशिकर व माजी उपसरपंच गणेश देशमुख यांनी शेतीच्या मधून रस्ते व झोन चुकीचे असल्याचे सांगितले .
देवले चे सरपंच महेंद्र आंबेकर यांनी या भागातून सात स्कीम सरकारने नेल्याने आल्पभूधारक शेतकरी झाला आहे ,आरक्षण रद्द करावे ,असे सांगितले .औंढोली चे युवा शेतकरी साईनाथ मांडेकर म्हणाले, शिवेवरील रस्ते व शेतातून जाणारे रस्ते चुकीचे असून धनिकांना वाचवून शेतकऱ्यांना भुमिहीन करण्याचा सरकारचा डाव आहे.मळवली चे माजी सरपंच प्रहर्षण भावसार म्हणाले , सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायतीच्या वतीने याविरोधी ठराव करून दिले पाहिजेत.

डोंगरगाव चे विजय कचरे म्हणाले ,पीएमआरडीए चा आन्याय कारक आराखडा उखडून टाकला पाहिजे. केवरे प्रेमनगरचे महेंद्र शेडगे म्हणाले ,आमच्या घराचे जागेत कब्रस्तानचे आरक्षण टाकले आहे , हे आम्हाला देशोधडीला लावणारे आहे.यावेळी औंढे मधील सखाराम घनवट म्हणाले , एक्सप्रेस हायवेत ५५ गुंठे जमिन गेली.आता ११० एकरवाले सोडून देत आमच्या शेतात आरक्षण टाकले चुकीचे आरक्षण काढून टाकावे .देवलेतील महिला संचालिका मनिषा आंबेकर यांनी पूररेषा चुकीची असल्याचे सांगितले .पाटणचे माजी सरपंच गुलाब तिकोणे म्हणाले , आरक्षण मुळे ८०% शेतकरी भूमिहीन व बेघर होतील. उद्योग व्यवसायाला चालना देणारे आरक्षण हवे.
यावेळी वरसोली चे माजी सरपंच संजय खांडेभरड, भाजे चे माजी उपसरपंच अशोक दळवी , कार्ला चे उपसरपंच किरण हुलावळे , माजी उपसरपंच कैलास हुलावळे , सदापूरचे प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय ढाकोळ,कार्ला एकविरा व्यापारी संघटना अध्यक्ष संजय देवकर आदी उपस्थित होते.दहिवली चे माजी सरपंच भाऊसाहेब मावकर यांनी वाकसई ते शिलाटणेच्या रस्त्याच्या चुकीचे आरक्षण मुळे अनेक शेतातून रस्ता जात आहे.तो डोंगरालगत गेला पाहिजे.नाहीतर लोक भूमिहीन होतील.कुरवंडे चे शेतकरी सुरेश कडू म्हणाले सुमारे १ हजार एकर जमिन आधीच आयएनएसमधे गेली आहे.आम्हाला जमिनी अल्प असून आरक्षण रद्द करावे.आसे म्हणाले .
सूञसंचालन दहिवली चे माजी उपसरपंच तानाजी पडवळ यांनी व कार्लाचे उपसरपंच किरणजी हुलावळे यांनी केले

माजी पंचायत समिती सदस्य दिपकशेठ हुलावळे म्हणाले , पीएमआरडीए यांचे अधिकारी शेतकऱ्यांनी केलेल्या हरकतीचे अर्जावर शेतकऱ्यांना विश्वासात घेवून आरक्षण टाकलेल्या जागेबाबत मार्ग काढतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!