आरोग्य व शिक्षण

बाबुराव वायकर यांच्या वतीने अंगणवाड्यांना विविध वस्तूंचे वाटप

Spread the love

मावळ : येथे बाबुराव वायकर सभापती कृषि व पशुसंवर्धन यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण कल्याण विभागाच्या फंडातून तालुक्यातील वडगाव (केशव नगर, खंडोबा मंदिर )अहिरवडे, वारंगवाडी, नांणोली, चाकण या ठिकाणी असणाऱ्या अंगणवाड्यांना विविध इलेक्ट्रॉनिक व उपयोगी  संचांचे वाटप करण्यात आले.

अंगणवाड्या स्मार्ट बनवाव्यात या उद्देशाने बाबुराव वायकर व उपनगराध्यक्ष पूजा वहिले यांच्या हस्ते सोलर लायटिंग सिस्टीम-इन्व्हर्टर,बॅटरी,ट्यूब,फॅन ,ई लर्निंग हार्डवेअर सॉफ्टवेअर ,टीव्ही(32इंच) ,डेस्क फ्लोअर सिटिंग ,स्वच्छ भारत किट-लिक्विड सोप,वॉटर बॉटल, हातरुमाल,कंगवा,नेलकटर,कात्री,क्लीनिंग पावडर(10kg),ऑफलाईन वॉटर प्युरीफायर ,हँड वॉश बेसिन-टॅंक,बाउल,स्टँड,वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.उपसरपंच विशाल वहिले,मा.सरपंच विठ्ठल मोहीते,पै.सुनील दंडेल,मा.उपसरपंच अनिल मोहिते व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!