आरोग्य व शिक्षण

मावळात बजाज विशेष कोवीड 19 लसीकरण मोहिमेचे उद्या आयोजन

Spread the love

मावळ : जिल्हा परिषद पुणे व बजाज कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 15000 डोस  उपलब्ध झाले आहे. त्यामुळे  मंगळवार 31ऑगस्ट रोजी संपूर्ण मावळ तालुक्यात बजाज लसीकरण विशेष मोहीम साजरी होणार आहे

या दिवशी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्र असे एकुण 40 ठिकाणी 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी covid-19 च्या पहिल्या व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसरा डोससाठी लसीकरण होणार आहे. तरी covid-19 चे सर्व नियम पाळून गर्दी न करता सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अशी विनंती आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे

लस:: COVISHIELD =

1) प्राथमिक आरोग्य केंद्र=
तळेगाव ,
तळेगाव रिक्रीएशन हॉल,
खडकाळा,कार्ला,टाकवे,
येळसे ,आढ़ले

2) प्रा.आ.केंद्र तळेगाव अंतर्गत उपकेंद्र ::
आंबी,इंदोरी,निगडे,सदुंबरे,न.उंबरे

3) प्रा.आ.केंद्र टाकवे अंतर्गत उपकेंद्र ::
नागाथली

4) प्रा.आ.केंद्र खडकाळा अंतर्गत उपकेंद्र ::
वडगाव,करंजगाव, साते, सांगिसे

5) प्रा.आ.केंद्र कार्ला अंतर्गत उपकेंद्र ::
टाकवे खुर्द,भाजे,कुसगाव

6) प्रा.आ.केंद्र येळसे अंतर्गत उपकेंद्र ::
महागाव,कोथुर्ने,बौर

7) प्रा.आ.केंद्र आढले अंतर्गत उपकेंद्र ::
बेबेडोहळ ,शिवणे, दारुंब्रे, गहुंजे,चांदखेड,सोमाटणे

8)प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा

9) लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील केंद्र ::
शंखेश्वर ,रेल्वे ,एल अँड टी हॉस्पिटल

10) ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ,कान्हे

11)वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये वडगाव उपकेंद्र व इतर पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत

लोणावळा व तळेगाव नगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिरिक्त केंद्राबाबत संबधित मुख्याधिकारी न.प. व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय लोणावळा/ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे हे लस व मनुष्यबळ उपलब्धता लक्षात घेऊन याबाबतचे नियोजन करतील .

 

नागरीकांसाठी महत्वाच्या सुचना –

  1. सर्व केंद्रांवर सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे व संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यानंतरही आवश्यकतेनुसार लसीकरण सुरू राहील.

2) लसीकरणासाठी एकदम गर्दी करू नये

3) प्रत्येक लसीकरण केंद्रावर उपलब्ध मनुष्यबळानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी आत्तापर्यंत सुयोग्य नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व आत्ताही राहील.

4) सर्व लोकप्रतिनिधी,प्रशासकीय यंत्रणा,प्रसारमाध्यमे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गेले दिड वर्षापासून संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोविड रुग्णांचे उपचारात सहभागी आहे.तसेच गेले सात महिन्यापासून लसीकरणाच्या कामकाजामध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामकाज पाहत आहे. त्यामुळे आजपर्यंत मावळ तालुक्यात 1,77,683 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

5) लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी स्पर्धा करताना लसीकरण केंद्रांवर होणारे अनावश्यक वादविवादाचे प्रसंग, दबावतंत्राचा वापर टाळून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

6)लसीकरण प्रत्येकाचे होईपर्यंत शासनामार्फत लसीकरण सुरूच राहणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी व कोवीडचे नियम पाळून कोविड मुक्त मावळा साठी प्रयत्नांना साथ द्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!