आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

तडीपार सराईत गुन्हेगार राज पवारला अटक 

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी

Spread the love

लोणी : पुणे जिल्ह्यातील तडीपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

राज रवींद्र पवार (वय 24 रा. कवडीपाट, कदमवाक वस्ती ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज पवारला परिमंडळ 5 च्या पोलिस उपआयुक्त यांच्या आदेशान्वये डिसेंबर 2021 पासून दोन वर्षाकरता पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते.परंतु आरोपी राज पवार हा तडीपार असतानादेखील कवडीपाट व परिसरात हातात कोयता घेऊन दहशत पसरवत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व सहकाऱ्यांना सूचना दिल्या. सदर पथकाने आरोपीला कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट येथून पाठलाग करून ताब्यात घेतले.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड ,अमित साळुंके, राजेश दराडे आणि बाजीराव वीर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!