आरोग्य व शिक्षण

दिव्यांगांना रखडलेले अनुदान मिळावे यासाठी जनसेवा विकास समिती ठिय्या आंदोलन करणार

Spread the love

तळेगाव : दिव्यांग बांधवांच्या मूलभूत अनुदानाच्या प्रश्नासाठी जनसेवा विकास समितीच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी तळेगाव नगरपरिषद येथे सकाळी 10:30 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेच्या वतीने अनुदान देण्यात येते. 340 दिव्यांग बांधवांचे अनुदान मागील 3 महिन्यांपासून रखडले आहे. या प्रश्नाचा जनसेवा विकास समिती गेले काही दिवस पाठपुरावा करत आहे.

समितीच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस स्थानक व तळेगाव नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक समीर खांडगे, प्रवक्ता मिलिंद अच्युत व नगरसेवक रोहित लांडगे, कल्पेश भगत उपस्थित होते.

दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळावे यासाठी समिती प्रयत्नशील आहे. अनुदान हा दिव्यांगांचा मूलभूत हक्क आहे. यासाठी त्यांना वाट पहावी लागणे ही खेदजनक बाब आहे. दिव्यांग त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू नये यासाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!