आरोग्य व शिक्षण

पुणे जिल्हा कोंग्रेस आयच्या ग्रामीण सांस्कृतीक विभाग जिल्हाध्यक्षपदी विशाल वांळुज

Spread the love

तळेगाव : पुणे जिल्हा कोंग्रेस आयच्या ग्रामीण सांस्कृतीक विभाग जिल्हाध्यक्षपदी विशाल सतीशशराव वांळुज यांची नुकतीच निवड झाली.पुणे कोंग्रेस आय जिल्हाध्यक्ष मा.आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थीतीत महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतीक अध्यक्षा विद्याताई कदम यांनी त्यांना नियुक्तीच पत्र प्रदान केले.

आपल्या पदाचा वापर विशाल वांळुज सांस्कृतीक चळवळ तळागळात पर्यंत पोहचविण्यासाठी करतील व ही जबाबदारी नक्कीच व्यवस्थीतरित्या पार पाडतील असा विश्वास विद्याताई कदम यांनी व्यक्त केला.

आमदार श्री संजयजी जगताप यांनी आपल मनोगत व्यक्त करताना विशाल वांळुज हे उच्च शिक्षित तरुण असुन त्यांच्या पदाला ते योग्य न्याय देउन कोंग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहचवतील व येनार्या काळात कोंग्रेस पक्ष हा युवकांसाठी मोठी संधी देनार असुन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले कार्यकरत्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहनार असल्याची ग्वाही दिली.

या प्रसंगी विशाल वांळुज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की वांळुज घराण हे कोंग्रस विचारांच एकनिष्ठ अस घराण असुन पक्षात अनेक स्थित्यांतर आली पण तळेगाव दाभाडे मध्ये वांळुज कुटुंबानी पक्षाची कधीच साथ सोडली नाही..पक्षात या कुटुंबाची ४ थी पिढी माझ्या रूपान कार्यरत असुन माझे पंजोबा कै.नारायण रामजी वांळुज हे जुन्या पिढीतील जेष्ठ कोंग्रस नेते होते ते सलग १० वर्ष तळेगाव दाभाडे नगरपरीषदेचे नगराध्यक्ष होते.तसेच पुणे जिल्हा कोंग्रसचे अध्यक्षही होते.माझी निवड या पदासाठी करुण पक्षान माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे याबद्दल मी कायमच पक्षाचा ऋणी असेल. नाना साहेब पटोले ,विद्याताई कदम व आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल राहिल असा शब्द दिला.

सदर प्रसंगी संग्रामदादा मोहळ,यादवेंद्र खळदे,बापुसाहेब ढमढेरे,पृथ्वीराज काळोखे,चंद्रभान खळदे,महादेव कांबळे ,सम्राट साळवी आदी मान्यवर उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!