आरोग्य व शिक्षण

शिक्षकदिन उत्साहात साजरा

Spread the love

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी यांच्या तर्फे काल (5 सप्टेंबर) रोजी  स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे ‘शिक्षकदिन’ साजरा करण्यात आला.

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाची सुरुवात प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी च्या अध्यक्षा सुमती निलवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास मिलिंद शेलार तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलघे ,  विल्सन सालेर, .प्रविण जाधव, सुनील खोल्लम,  योगेश शिंदे, शालेय पर्यवेक्षिका रेणू शर्मा  आदी मान्यवर तसेच शालेय शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कवी कुसुमाग्रज यांच्या ‘कणा या कवितेतून माजी राष्ट्रपति राधाकृष्णन यांचे विचार आजच्या पिढीत रुजले पाहिजे व तसेच तंत्रज्ञानाचे ज्ञान घेऊन सक्षम शिक्षक निर्माण होतील असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य  संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.

सुमती निलवे यांनी आपल्या मनोगतातून कोरोना काळाचे आव्हान पेलत नवीन पिढी घडविण्याचे शिक्षकांचे मोठे योगदान आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी सदस्य मिलिंद शेलार व सुमती निलवे या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार सर्व रोटरी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुंजाळ मॅडम यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!