आरोग्य व शिक्षण

लोणावळा नगरपरिषदेच्या भाजीमंडईला कधी मुहूर्त मिळणार?

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या महात्मा फुले भाजीमंडईला मुहूर्त कधी मिळणार ? असा प्रश्न विचारत समांतर भाजीपाला विक्री केंद्रामुळे स्थानिक भाजीमंडईतील भाजीविक्रेते यांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद झाला आहे.  कोरोनामुळे सर्व दुकानदारांना  लॉकडाऊनचा फटका बसला आहे. भाजी विक्रेत्यांस ,औषधे ,दुग्धव्यवसायिक यांना थोडाफार दिलासा मिळाला असला  तरी कोरोनाच्या भीतीने शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनचा भाजीमंडईला फटका बसत असतो.

लोणावळ्यातील महात्मा फुले भाजीमंडईला जुनी इमारत तोडून नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यासाठी दोनवेळा नारळ फोडण्यात आले. ठराव झाले. पण वर्क आॕर्डर न मिळाल्यामुळे भाजीमंडईला ग्रहण लागले व इमारतीचा जुना आराखडा की नवीन आराखडा याबाबत घोळ कायम राहून काम प्रगतीपथावर होण्याऐवजी बारगळले आहे.लोणावळ्यातील भाजी मंडई फारच जुनी आहे. मंडई गळत असल्याने भाजी विक्रेते दरवर्षी कागद लावतात

भाजीमंडईला लागूनच भाजीविक्रेते व फळविक्रेते आहेत. नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र बँकेच्या मागील रस्त्यावर आता रोज भाजी विक्रेत्यांस बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने भाजीमंडईतील भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आणण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे.  नगरपरिषदेच्या वतीने मनमानी केल्याचा आरोप भाजीमंडईतील जुन्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.

यामुळे समांतर भाजीमंडईच किंवा आठवडे बाजार रोजचा बाजार सुरू केल्याचा फटका येथील भाजीमंडईतील विक्रेत्यांना बसला आहे, असे येथील भाजीमंडईतील स्थानिक जुन्या भाजी व फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले.येथे शुक्रवारी भरणारा आठवडेबाजारा सारखी गर्दी या भाजी विक्रीसाठी आलेल्या दुकानात रस्त्यावर असते .नगरपरिषदेच्या या समांतर आठवडे बाजारामुळे हा परिसर रोजच गर्दीने फूलून जातो. कोरोनाच्या तिस-या लाटेची भीती नगरपरिषदेच्या प्रशासनाला राहिलेली नाही. तशीच भाजी विक्रेते व ग्राहकांना नाही ,असे नागरिकांनी सांगितले.यामुळे नवीन भाजीमंडई  होण्यासाठी किती काळ वाट पहावी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!