आरोग्य व शिक्षण

कार्ला गडावरती दरड कोसळून लेणीचे नुकसान ; पर्यटकांसाठी लेणी बंद

Spread the love

लोणावळा : कार्लाच्या श्री एकविरा देवी मंदिरासमोर कार्ला लेणीच्या समोर असलेली दरड मंगळवारी कोसळली.या ठिकाणी कुणीही नसल्यामुळे जीवितहानी माञ टळली.

या घटनेबाबत माहिती मिळताच येथे गडावर वेहेरगावचे पोलिस पाटील अनिल पडवळ,उद्योजक मोरेश्वर पडवळ , युवक राष्ट्रवादी काॕँग्रेसचे नाणेमावळ अध्यक्ष संतोष गायकवाड आदी पोहोचले .

आई एकविरा गडावरील कार्ला लेणीच्या बाजूला दरड कोसळल्यामुळे मावळचे तहसीलदार श्री.मधुसुदन बर्गे , कार्लाचे मंडल अधिकारी कार्ला माणिक साबळे , तलाठी मीरा बोऱ्हाडे, वेहेरगाव च्या सरपंच अर्चना संदीप देवकर, अशोक कुटे,उद्योजक मोरेश्वर पडवळ व पोलीस पाटील श्री.पडवळ , संतोष गायकवाड ,सचिन देशमुख, व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, लेणी व्यवस्थापक भोपळे साहेब यांनी पाहणी केली. व पुरातत्व विभाग, पुणे यांनी जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तो पर्यंत लेणी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!