आरोग्य व शिक्षण

24 सप्टेंबर रोजी तळेगावात विशेष लसीकरण मोहीम

Spread the love

तळेगाव : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने व मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून शुक्रवार (24 सप्टेंबर) रोजी तळेगाव शहरात मोफत covid-19 महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी साक्षी डायग्नोस्टिक यांच्यावतीने वैशाली मंगल कार्यालय व लायन्स क्लब येथे लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. लसीकरणासाठी साक्षी डायग्नोस्टिक व सुनील शेळके मित्रमंडळ यांच्यामार्फत इंजेक्शन साठी लागणा-या 2000 सिरींग्सचा पुरवठा करण्यात आला आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी शहरातील नागरिकांनी सकाळी दहा ते पाच या वेळेत लसीकरण केंद्रांवर उपस्थित राहावे. यासाठी आधारकार्ड सोबत बाळगावे.तसेच लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन साक्षी डायग्नोस्टिकचे डायरेक्टर सिद्धार्थ किल्लावाला व बिजेंद्र किल्लावाला यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!