कृषीवार्ता

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सांडवली गावामध्ये पशुधन तपासणी व लसीकरण शिबीर संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / दि 15/03/2022 रोजी बामणोली वन्यजीव परिक्षेत्राच्या बफर क्षेत्रातील सांडवली, ता.जि. सातारा या गावामध्ये पशुधन तपासणी व लसीकरण शिबीर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व पशु वैद्यकीय दवाखाना परळी यांचे संयुक्त विद्यमाने पार पडले,
सदर भागातील गुरांमध्ये आवश्यक मिनरल व व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळेविविध समस्या उदभवत असल्याने मिनरल ब्रिक्स ( चाटण), व कॅल्शिअम करिता calcium oral suspension वाटप करण्यात आले,
तसेच जंत/कृमी मुळे दूधा वर परिणाम होत असल्याने जंत प्रतिबंधक गोळ्या व suspension वाटप करण्यात आले.गाभण न राहणाऱ्या जनावरांकरिता infertility kit चे वाटप करण्यात आले.याव्यतिरिक्त सदर शिबिराच्या दरम्यान आजारी गुरांची आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात आली,

तसेच गाभण जनावरांची काळजी घेण्याबाबत व औषधोपचारा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सदर शिबीरा वेळी अर्चना जठार ,पशुधन विकास अधिकारी, पशु वैद्यकीय दवाखाना परळी
बलदेव निकम, पशुधन सहाय्यक
जीवन गायकवाड, परळी दवाखाना
संपत गायकवाड, सोनवडी दवाखाना
सागर कुलकर्णी, सहाय्यक यांनी गुरांची तपासणी व औषधोपचार केले .
व गावातील 224 गाय/बैल, 40 म्हैस, 100 शेळ्या व 102 मेंढ्यांकरिता वरीलप्रमाणे आवश्यक औषधांचे वाटप केले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असणाऱ्या अति दुर्गम गावांतील ग्रामस्थांच्या पशुधनाची तपासणी व लसीकरण उपक्रम अंतर्गत मा. उपसंचालक, उत्तम सावंत, मा सहा.वनसंरक्षक ,सुभाष बागडी यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण हसबनीस, वनक्षेत्रपाल वन्यजीव बामणोली, आ.पा.माने, वनरक्षक पळसवडे,दा मा जानकर ,वनरक्षक वेळे, दि भा सोरट, वनरक्षक देऊर यांनी सदर शिबीर पार पाडले.
सदर शिबीर संपन्न होण्यास गणेश चव्हाण, सरपंच सांडवली यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!