आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे येथे रंगली कोजागरी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक मेजवानी

Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगाव येथे सेवाधाम वाचनालयाच्या पटांगणात रंगलेल्या सांस्कृतिक वातावरणात उपस्थित रसिकांना कोविड च्या प्रदीर्घ कालावधीनंतर संगीताची मेजवानी अनुभवायला मिळाली.

“उगवला चंद्र आरोग्याचा ” या विस्तृत आणि कलात्मक संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सांगितिक सौंदर्याने परिपूर्णतेने नटलेला बहारदार असा कार्यक्रम सादर झाला.

हा कार्यक्रम सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने सादर करण्यात आला. सुरुवातीला तळेगाव दाभाडे येथे रंगली कोजागरी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक विलक्षण मेजवानी
अनुभवायला मिळाली.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे या संस्थांचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले तरसेवा धाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय या संस्थेच्या सचिव वर्षा वाढोकर यांनी या संदर्भात थोडक्यात माहिती दिली .

उगवला चंद्र आरोग्याचा’ या कार्यक्रमात पंडित विनोद भूषण अाल्पे, प्रकाशराव जोशी, श्रुती देशपांडे, सिद्धि परदेशी, डॉ. मधुरा निकम, संपदा थिटे व सुरेश साखवळकर आदि मान्यवर गायकांनी रसिक श्रोत्यांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध केले.

या मैफिलीत चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी, राम रंगी रंगले, विठ्ठल किती घ्यावा, राजस सुकुमार, हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, गर्द सभोती रान साजणी, कानडा राजा पंढरीचा, रुपेरी वाळूत, नारायणा रमा रमणा, खेळ मांडीयेला,उगवला चंद्र पुनवेचा, पद्मनाभा नारायणा, हे सुरांनो चंद्र व्हा, विठ्ठल विठ्ठल गजरी आदि गीतांच्या सादरीकरणाने सुरांच्या सागरात रसिक न्हाऊन निघाले.
ऑर्गन वर संजय गोगटे तर तबला केदार कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात समर्थ साथ दिली. तर या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सृजन नृत्यालयाच्या संचालिका मीनल कुलकर्णी यांनी आपल्या रसाळ वाणीने आणि मधुर शैलीत केले.

खुप दिवसानंतर कलेचा परिपूर्ण आस्वाद प्रत्यक्ष घेता आला याबद्दल रसिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी कोजागरीच्या पवित्र परंपरेला अनुसरून मसाला दुग्ध पानाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आवाज न्यूज फेसबुक पेजवर करण्यात आले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!