आरोग्य व शिक्षण

टाकवे गावात आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

टाकवे : येथे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीराव असवले मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचा तब्बल 180 नागरिकांनी लाभ घेतला.शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे व गरजूंना धान्य,साड्या व पुरुषांना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व तालुका राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले मित्रपरिवार व हीलींग हँड्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!