आरोग्य व शिक्षण

राज्यात ७५०० कोटींची आरोग्ययंत्रणेसाठी तरतुद – अजित पवार 

लोणावळ्यात उपजिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन संपन्न

Spread the love

लोणावळा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली राज्यात ७५०० हजार कोटी रूपयांची आरोग्य यंत्रणेसाठी तरतूद केली आहे.आरोग्यकेंद्र उभारण्याचा मानस आहे.सुमारे साडेसातहजार कोटी त्यासाठी खर्च होणार आहे. राज्यात कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या आघाडी सरकारने परिस्थिती चांगली हाताळली. आजूनही धोका टळलेला नाही. लोकांनी हलगर्जीपणा न करता मास्क वापरणे बंधनकारक आहे. लोणावळ्यात डाॕ.बाबासाहेब डहानूकर रूग्णलयाचे जागेवर ४१ कोटीचे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय बांधण्यात येणार असून त्यासाठी मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी आपरिमित पाठपुरावा केला. चांगला विकास आराखडा तयार केला आसून गेल्या आनेक वर्षापासून लोकांची मागणी होती.ती पूर्ण होत आसल्याने व तरूण हरहुन्नरी आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपूजन होत आहे याचा मला पालकमंञी म्हणून आनंद आहे असे राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार म्हणाले.

 

लोणावळा शहरात सुमारे शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णलयाचे भूमिपूजन उपमुख्यमंञी आजित पवार यांचे हस्ते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये झाले यावेळी  पवार बोलत होते.

यावेळीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पूसाहेब भेगडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे , मावळचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी , महिला शहराध्यक्षा मंजुश्री वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, विठ्ठल शिंदे , तळेगाव येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी गणेश खांडगे , माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , सहकार महर्षी माऊली दाभाडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , शिवसेना लोणावळा शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक, लोणावळ्याचे महाविकासआघाडीचे नगरसेवक , नगरसेविका , शहराध्यक्ष , आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आदरणीय शरदचद्रजी पवार साहेब यांचा सहस्ञचंद्रदर्शन सोहळा या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा तसेच मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम होत असून मावळात सुमारे तीनशे कोटीच्या कामांचे भूमिपूजन विविध रस्ते ,उपजिल्हा रूग्णालय लोणावळा व कान्है तसेच मावळची शासकीय इमारत ,लोणावळ्याच्या विविध भागात दहा कोटीचे रस्ते , तसेच कार्लाजवळ २५ कोटीचा रस्ता होत आहे. एकविरा देवीच्या गडावर होणाऱ्या रोप वे चे भूमिपूजन मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांचे हस्ते होणार आसून लोणावळ्याचे रोप वे बाबत ठोस निर्णय घेण्याची मंञीमंडळात शिफारस करतो. शहर पर्यटनस्थळ असल्याने येथील आमदारांनी भाषणातून सांगितले त्याप्रमाणे महाबळेश्वर व माथेरान धर्तीवर हॉकर्सझोन केल्यास बेरोजगार तरूणांना रोजगार मिळेल व रस्ते रूंद होऊन वाहतुकीसाठी अडथळा येणार नाही. मावळ विधानसभेची जागा तीस वर्षांनी आपण सुनिल शेळके यांना ढीगभर मते देवून जिंकलो यांचा मनस्वी आनंद आहे.

यावेळी आमदार सुनिलआण्णा शेळके म्हणाले, आपण निवडणुकीत जनतेला शब्द दिला होता . ते काम आज राज्याचे ४१ कोटी निधीतून होत आहे. उपमुख्यमंञी अजित पवार यांनी आमचे वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करून पर्वणी साधल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. लोणावळ्याच्या आरूंद रस्त्यावर टपरीवाले , हातगाडीवाले ,फेरीवाले यांचे पुनर्वसन केल्यास वहातूक कोंडी सुटेल. रोप वे साठीही दादांनी लक्ष घालावे अशी मागणी करतो.उपजिल्हा रूग्णलयाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने वेगाने व चांगले करावे यासाठी आमचे लक्ष राहीन.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, लोणावळा शहरात शंभर बेडचे उपजिल्हा रूग्णालय व्हावे आशी सर्वांची इच्छा होती. मधल्या काळात कोरोना महामारीची लाट आली.आरोग्याची कमतरता लोणावळ्यात जाणवत होती. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व उपमुख्यमंञी आजितदादा पवार यांचे माध्यमातून येथे शंभर काॕटचे रूग्णलयाचे भूमिपूजन होत आहे.पर्यटकांची सतत वर्दळ असलेले हे शहर थंडगार हवेचे ठिकाण आहे.महाविकासआघाडीचे आर्थमंञी म्हणून आजितदादा पवार यांनी जनतेच्या सोयी सुविधेसाठी रूग्णलयाचे , रस्ते , पूल,पाणीपुरवठा योजना आदी कामे हाती घेतली आहेत,याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आसल्याचा आनंद आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रारंभी छञपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्यास व महात्मा फुले आर्ध पुतळ्यास उपमुख्यमंञी पवार यांनी पुष्पहार आर्पण केल्यावर पुष्पहार उपमुख्यमंञी व आमदार यांना मोठा पुष्पहार घालून त्यांचे कटावूट उभारून व दहा ढोलताशा पथके यांचे दणदणाटात व फटाके वाजवून स्वागत करण्यात आले..तसेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून टिकाव मारून व कोनशिला आनावरण करून तसेच महापुरूषांचे प्रतिमेला फुले वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

लोणावळ्याचे मुख्याधिकारी यांनी सर्वांचे प्रास्तविक करून व आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी स्वागत करून सभेला प्रारंभ झाला. आभार तळेगावचे राष्ट्रवादी चे पदाधिकारी गणेश खांडगे यांनी मानले.

लोणावळा नगरपरिषदेच्या या उपजिल्हा रूग्णलयाचे भूमिपूजन कार्यक्रमास लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व काही नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक त्यात भरत हारपुडे,कल्पनाताई आखाडे , शिवदास पिल्ले , पूजा गायकवाड , सुधीर शिर्के , भरत हारपुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!