आरोग्य व शिक्षण

लोणावळा शहराला पर्यटनाचा दर्जा द्यावा

लोणावळा शहर शिवसेनेची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

Spread the love

 

मुंबई : लोणावळा शहराला पर्यटनाचा दर्जा मिळावा व शहर परिसरातील पर्यटन स्थळे विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट अतिथी सभागृहावर भेट घेवून लोणावळा शहर शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले व संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांच्या उपस्थितीत पुढील काही दिवसात संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवून यांच्याशी चर्चा करुन पुढील कार्यवाहीचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक यांना दिले.

यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेवक शिवदास पिल्लै, नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेविका सिंधू परदेशी, शहर समन्वयक जयवंत दळवी जेडी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, युवासेना मावळ तालुका अधिकारी शाम सुतार, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभागप्रमुख रतन मराठे आदी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!