आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब आयोजीत देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Spread the love

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम .आय. डी. सी .व मावळ नगरी सह पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन द्वारा आयोजित भव्य तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल (21ऑक्टोबर ) रोजी पार पडला.

रोटरी क्लब तळेगाव एम .आय.डी.सी व मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगायन स्पर्धा 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी  स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व मावळ तालुका गट शिक्षणाधिकारी मा. श्री बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते संपन्न झाला.

महात्मा गांधी ,स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन ,संत तुकडोजी महाराज या महापुरुषांचे विचार मैदानात जाऊन मुलांनी खेळले पाहिजे, अंगी बाळगून मैदानात जाऊन मुलांनी खेळले पाहिजे स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचा विकास केला पाहिजे महापुरुषांचा वारसा पुढे चालवत विद्यार्थी देश बलवान करतील असे मत पारितोषिक वितरण समारंभ निमित्त गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ बाळासाहेब राक्षे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या प्रसंगी रो.क्लब तळेगाव एम.आय.डी.सी संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष खांडगे, रो.क्लब तळेगाव एम.आय.डी.सी विद्यमान अध्यक्षा सौ.सुमती निलवे व सचिव प्रविण भोसले मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सुनील भोंगाडे, सचिव विलास टकले, रो. प्रकल्प प्रमुख रो. मिलिंद शेलार सर ,रो सचिव कोळवणकर ,रो पांडुरंग पोटे, रो लक्ष्मण मकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी मावळ नागरी सह पतसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. सुनील नाना भोंगाडे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी साहेब यांचा शाल, मानचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 द्वारा आयोजित वाइन चाणक्य फायनान्स लिटरसी प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडेचे 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. रो. अध्यक्षा सौ. सुमती निलवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत शिक्षकांसाठीही ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले होते ;त्याचे प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रातिनिधिक स्वरूपात घेण्यात आला. शिवाजी विद्यालय देहूरोड येथील कलाशिक्षक  मिलिंद शेलार व स्वामी विवेकानंद स्कूलच्या पर्यवेक्षिका.रेणू शर्मा  यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणा संदर्भात प्रतिक्रिया देताना  अमृता जाधव स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल हीने या प्रशिक्षणाने भविष्यात मिळणाऱ्या मिळकतीचे नियोजन कसे करावे याचे बाळकडू आम्हाला मिळाले व त्यायोगे आतापासूनच आम्ही आमच्या पॉकेटमनी चे नीट व्यवस्थापन करू शकतो असा विश्वास दर्शविला .
शिक्षकांच्या प्रशिक्षणा संदर्भात प्रतिक्रिया देताना रेणु मॅडम यांनी हे प्रशिक्षण एकविसाव्या शतकातील शिक्षकांना सर्व आव्हानांना पेलण्यासाठी सक्षम बनवणारे होते अशी प्रतिक्रिया दिली.

मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे कार्याध्यक्ष मा. सुनील नाना भोंगाडे यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थी उत्कर्षासाठी स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे असे वक्तव्य केले.

समूह गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचा निकाल 
इयत्ता आठवी ते दहावी या गटात-

साईराज तसनूसे नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे रु.1501/- प्रथम पारितोषिक; श्रेया घरदाळे पवना विद्यालय पवनानगर द्वितीय रु 1001/- तमन्ना सय्यद अॅड. पु.आ .परांजपे विद्यालय तळेगाव दाभाडे रु 701 तृतीय पारितोषिकउत्तेजनार्थ लयकाशा चांदबाशा शेख कन्या शाळा क्र. 4 तळेगाव दाभाडे यास रु 501/-रुपये पारितोषिक प्रदान करण्यात आले.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटांमध्ये-

रुद्राक्ष चेतन जाधव कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यार्थ्यास प्रथम क्रमांकाचे रु 1001/सृष्टी विनय खानसोळे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे यास 701/- द्वितीय क्रमांकाचेअथर्व ढोरे प्रगती विद्या मंदिर या विद्यार्थ्यास तृतीय क्रमांकाचे 500/- रुपये ;उत्तेजनार्थ कावेरी ठाकर पवना विद्यालय पवनानगर यास रुपये 301/- पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पहिली ते चौथी गट-

प्रथम क्रमांक निकुंज शरणागत जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी नेरे मुळशी यास 701 /-रुपयांचे पारितोषिक ;द्वितीय क्रमांक स्वरा राहुल पवार स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे रु 501 /-रुपयाचे पारितोषिक ;तृतीय क्रमांक श्रेयस महाले आदर्श विद्यालय तळेगाव दाभाडे यास रु 301/- पारितोषिक ;तसेच उत्तेजनार्थ श्रीयुक्त जगताप माउंट सेंट स्कूल तळेगाव दाभाडे 201/-रुपयाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!