आरोग्य व शिक्षण

नगरसेविका मंगल जाधव यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Spread the love

तळेगांव : येथील नगर परिषदेच्या  नगरसेविका मंगल सुरेश जाधव यांच्या प्रभाग क्र. १० च्या कार्यअहवाल प्रकाशन सोहळा  माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या  शुभहस्ते आज कै.कासाबाई भेगडे सभागृह येथे पार पडला.

यावेळी बोलताना स्व.रामभाऊ म्हाळगी यांच्या आदर्शा नुसार लोकप्रतिनिधींनी नागरिकांप्रति आपले उत्तरदायित्व म्हणून कार्य अहवाल सदर करणे हे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेतून नगरसेविका मंगल जाधव व सचिन जाधव यांनी हा कार्यअहवाल सादर केला आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री.गणेशभाऊ भेगडे यांनी सध्याची राजकिय परिस्थिती व आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

तळेगांव दाभाडे शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र माने,उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,माजी नगराध्यक्ष .राजेंद्र जांभुळकर,नगरसेवक संतोष दाभाडे,माजी नगरसेवक सुरेशनाना दाभाडे यांनी नगरसेविका मंगल जाधव व सचिन जाधव यांच्या कार्याचा गौरव करुन प्रभाग १० चा इतिहास व जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान व सद्यपरिस्थिती यावर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक नगरसेविका  मंगल सुरेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिष राऊत आणि आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी व कार्यक्रमाचे नियोजन  प्रशांत दाभाडे यांनी केले.

यावेळी पुणे जिल्हा भाजपा खजिनदार इंदरशेठ ओसवाल,तळेगांव दाभाडे नगर परिषद भाजपा गटनेते अरुण भेगडे,नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे, प्राची हेंद्रे,  संजय ओसवाल, रशीदभाई सिकीलकर सुरेश झेंडे  तळेगांव दाभाडे शहर भाजपा सर्व पदाधिकारी, विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष व पदाधिकारी,प्रभाग क्रमांक १० च्या माता महिला भगिनी व विविध पदावर काम करणारे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते बंधु भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!