आरोग्य व शिक्षण

तळेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा ; अन्यथा आंदोलन – मा. नगरसेवक सचिन टकले

Spread the love

तळेगाव : शहरातील रस्त्यांवर वावरणाऱ्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मा. नगरसेवक सचिन टकले यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

तळेगावकर नागरी मोकाट कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. गाड्या मागे धावणे.अचानक चालकाच्या मागे धावून चावणे. रस्त्यांवरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला,मुले यांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. रात्रीपाळीला जाणा-या कामगारांना सुद्धा जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. आजपर्यंत अनेक जणांना कुत्रे चावल्यामुळे दवाखान्यात भरती करावे लागले असून नाहक खर्चाला समोर सामोरे जावे लागले आहे असे निवेदनात म्हटले आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा येत्या आठ दिवसात बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!