आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

लोणावळ्यात फोर्ड कार पार्क करताना कारखाली सापडून चिमुकल्याचा दूर्दैवीपणे मृत्यू..

बापाच्या कारखाली मुलगा ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त.

Spread the love

लोणावळ्यात फोर्ड कार पार्क करताना कारखाली सापडून चिमुकल्याचा दूर्दैवीपणे मृत्यू..

बापाच्या कारखाली मुलगा ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ८ जानेवारी.

लोणावळ्यात फोर्ड कार पार्क करताना कारखाली सापडून चिमुकल्याचा दूर्दैवीपणे मृत्यू झाला. कार पार्क करताना चालकाचे फोर्ड कारखाली त्याचेच तीन वर्षाचे बालकाचा खेळत असताना चिरडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही अत्यंत हृदय हेलावणारी घटना घडल्याने पोलिसांना काय करावे , हे सुचेना , अखेर त्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतल्याने आकस्मात मयत नोंद करण्यात आली.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार किआंश किरण माने (वय-०३वर्षे , रा -चिखली , सानेचौक , ता-हवेली , जि-पुणे ), असे दूर्दैवीपणे कारखाली चिरडून मरण पावलेल्या चिमुरड्या बालकाचे नाव आहे. किरण राजकुमार माने (वय-२८, रा-चिखली , सानेचौक , ता-हवेली , जि-पुणे ),असे या दुर्घटनेतील बापाचे नाव आहे. गाडी पार्क करताना ही आकस्मिक घटना घडली .

या अपघात प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांकडून आकस्मिक मयत अशी नोँद केली आहे. या घटनेबाबत खबर देणार दिपक शिवाजी वारंगुळे ,वय-२८,व्यवसाय -कन्स्ट्रक्शन , रा-भोसरी , आदीनाथनगर,गव्हाणेवस्ती ),यांनी खबर दिली आहे.

घडलेली घटना अशी : आज ता.८ रोजी दुपारी २.४० वा.सुमारास लोणावळा येथील मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या हाॕटेल आर्चिड चे समोर पार्कींग मधे किरण राजकुमार माने (वय-२८, रा-चिखली , सानेचौक , ता-हवेली , जि-पुणे ),याने गाडी पार्क करीत आसताना यांचे ताब्यात आसणारी गाडी नंबर फोर्ड इनडियार गाडी नं एम एच १४,जे एच-९०००,या गाडीपुढे खेळणारा किआंश किरण माने (वय-०३,रा -चिखली ) हा याचे आंगावरून चाक गेल्याने तो मरण पावला.म्हणून माझी कायदेशीर फिर्याद आहे , असे वरील मजकूराचे फिर्यादीवरून दाखल मयताचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार .मडके हे करीत आहे.वगैरे मजकूराचे नमूद वेळी सरकारी वकील अॕड.उज्वल निकम साहेब यांचे एस्काॕट ड्युटी कामी पोलिसनाईक .मेस्ञी व पोलिस नाईक …..हे उपस्थित होते. या अपघात प्रकरणी भा.द.वि.कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असल्याचे शहर पोलिसांकडून समजले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!