आरोग्य व शिक्षण

चाकण चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा – डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. कोल्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश

Spread the love

चाकण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किमान 15 दिवसांसाठी चाकण चौकातील जड वाहतूक सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत बंद ठेवावी. तसेच या चौकातील वाहतूक कोंडीवर विविध उपाययोजना कराव्यात असे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलिस प्रशासनाला दिले.

दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्यां नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगर परिषद, मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत दिले.

या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कंटेनर सह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी 7 ते 10 सायंकाळी 4 ते 9 या वेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एसटी पीएमटी व खाजगी बसेसचे थांबे 100 मीटर पुढे नेण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या सहा आसनी रिक्षा व इतर वाहनांना चौकापासून 100 मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा.वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना केल्या.

तसेच पोलीस आयुक्त कट्टे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तातडीने तळेगाव चौकातील खड्डे बुजवण्याचे निर्देश खासदार डॉक्टर कोल्हे यांनी दिले.

या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक शिनगारे, राम गोरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!